महिला करत होती दादगिरी, वेटरने तोंडाला  फासला  केक
फोटो सौजन्य- फेसबुक
कीव्ह येथील एका हॉटेलामध्ये एका महिलेने खाण्यावरुन दादागिरी केल्याने चक्क वेटरने तिच्या तोंडाला केक फासला आहे. तर या महिलेने केलेल्या कृत्यामुळे वेटरचा संयम तुटल्याने हा प्रकार घडला आहे.
युक्रेनच्या गुर्राम्मा इटालिआना रेस्टॉरंटमध्ये दोन महिला खाण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी वेटर आणि त्याच्या सहकाऱ्याने या दोघींसाठी केक आणला तेव्हा त्यांनी शिव्या देत केकबद्दल बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या वेटर संतप्त होऊन तिच्या तोंडाला केक फासला आहे.

मात्र या दोन महिलांनी नेमक काय केल त्यामुळे वेटरवर ही पाळी असवी अशा चर्चा चालू आहेत. तसेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी महिलांच्या विरुद्ध आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.