एका महिन्याच्या चिमुरडीवर केला बलात्कार, नराधमाला 240 वर्षे तुरुंगाची शिक्षा
फोटो सौजन्य - गुगल

दिवसेंदिवस जगभरात लैंगिक अत्याचाराच्या घटनांची संख्या वाढत चालली आहे.त्यामुळे लोकांमध्ये विकृत कृत्ये करण्याचे प्रमाण हाताबाहेर जात आहे. अशीच एक घटना अमेरिकेमध्ये घडली आहे. या घटनेत नराधम पित्यानेच आपल्या एका महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

अमेरिकेत राहणारा पेट्रीसियो मेडिना असं या नराधमाचे नाव आहे. या घटनेतील आरोपीने ड्रग्जच्या नशेत हे कृत्य केले आहे. पेट्रीसियोने हे कृत्य करताना या चिमुरडीच्या वयाचे भान न ठेवता बलात्कार केला. त्यांनतर या चिमुरडीला विचित्र पद्धतीने मारहाण केल्याने हातापायची हाडे तुटली आहेत. परंतु हे सगळे कृत्य करत असताना पेट्रीसियोची बायकोही तिथे उभी होती. मात्र तिने नवऱ्याच्या या कृत्यावर पोलिसात तक्रारसुद्धा केली नाही.

या घटनेबद्दल पेट्रीसियो आणि त्याच्या बायकोला पोलिसांनी अटक केली आहे. तर पेट्रीसियोला 240 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.