'जगात असा एक देश आहे जो तिथल्या मुलीशी लग्न करणाऱ्या मुलास इतके पैसे देतो की त्या मुलाला पुढील आयुष्यात काहीही काम करावं लागणार नाही. कारण त्या मुलाला तिथल्या सरकारकडून मिळतात दरमहा 3 लाख रुपये मिळतात. त्यासोबतच त्या मुलाला मिळते त्या देशातील नागरिकत्व. पण या सगळ्यासाठी पती आणि पत्नीने लग्नानंतर त्या देशातच राहणे आवश्यक आहे व लग्न करण्यासाठी फक्त मुलांचीच पसंती नाही तर मुलींचीही पसंती तितकीच आवश्यक आहे,' अशी माहिती एका संकेतस्थळावर देण्यात आली होती.
ही बातमी आणि ही वेबसाईट इतकी वायरल झाली की अनेकांनी आइसलँडच्या मुलींनी फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवण्यास सुरुवात केली. आणि बघता बघता हा गोंधळ इतका वाढला की तिथल्या सरकारला या सर्वात अखेर हस्तक्षेप करावा लागला.
आइसलँडच्या सरकारने अखेर जाहीर केले आहे की त्या देशात 1007 पुरुषांमागे 1000 स्त्रिया आहेत आणि त्यामुळेच अशी कोणताही कायदा अद्याप तरी आइसलँड सरकार ने बनवला नाही. तर या सर्व अफवा असून या वर कोणीही विश्वास ठेऊ नये असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.