Ethiopian Airlines चं ET 302 कोसळलं, मृत 157 प्रवाशांमध्ये चार भारतीयांचा समावेश
Representational image of Ethiopian Airlines flight. (Photo Credits: Twitter)

Ethiopia Airlines Crash: इथियोपियाची राजधानी अदिस अबाबा पासून केनियातील नैरोबी (Addis Ababa-Nairobi ) येथे जात असलेले विमान आज कोसळले आहे. या विमानातील 8 क्रू मेंबर आणि 157  प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये चार भारतीय प्रवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे. ET 302 विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता अदिस अबाबा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. परंतु, 8.44 वाजता त्याचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

;

विमानकंपनीने आपातकालीन क्रमांक जाहीर केले आहेत. प्रवाशांच्या नातेवाईकांना या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती दिली जात आहे.