Baltasar Engonga, Anti-Graft Chief of Equatorial Guinea. (Photo credits: X/@chief_BaltasarE)

Equatorial Guinea Sex Video Scandal: आफ्रिकन देश इक्वेटोरियल गिनीच्या (Equatorial Guinea) एका उच्च सरकारी अधिकाऱ्याचे 400 हून अधिक अश्लील व्हिडिओ (Sex Videos) सोशल मीडियावर लीक झाले आहेत. यामुळे या मध्य आफ्रिकन देशात भूकंप झाला असून या मुद्द्यावरून सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. या व्हिडिओंमध्ये आरोपी सरकारी अधिकारी विविध सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्नींसोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसत आहे. या व्हिडिओंचा प्रसार रोखण्यासाठी अक्षरशः सरकारने इंटरनेटवर बंदी घातली आहे. आरोपी अधिकाऱ्याचे नाव बालटासर एबांग एनगोंगा () असे आहे. आरोपी अधिकारी नॅशनल फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमचा संचालक आहे. या प्रकारानंतर एनगोंगाची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

आरोपी अधिकाऱ्याचे कार्यालयासह विविध ठिकाणी महिलांशी शारीरिक संबंध होते. महत्वाचे म्हणजे ज्या महिलांसोबत आरोपी अधिकाऱ्याचे शारीरिक संबंध होते त्यापैकी अनेक इक्वेटोरियल गिनी सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांच्या पत्नी आहेत. इक्वेटोरियल गिनीचे उपाध्यक्ष टिओडोरो न्गुमा ओबोइंग यांनी त्यांच्या कार्यालयात लैंगिक संबंध ठेवणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे ते म्हणाले.

मध्य आफ्रिकेतील इक्वेटोरियल गिनीच्या या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचे गेल्या 15 दिवसांत साधारण 400 सेक्स व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक अश्लील व्हिडिओ लीक झाल्याच्या प्रकरणाला अचानक जग सेक्स स्कँडल मानत आहे, पण, यामागे आणखी काही कारण असू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांचे मत आहे की यामागे एक षडयंत्र असू शकते, ज्याद्वारे इक्वेटोरियल गिनीचा पुढील राष्ट्राध्यक्ष कोण होणार हे ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. (हेही वाचा: North Korean Troops Addicted to Porn: रशियाकडून लढण्यासाठी युक्रेनला पोहोचले उत्तर कोरियाचे सैन्य; अनलिमिटेड इंटरनेट मिळाल्याने जडले पॉर्नचे व्यसन)

व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्या महिलांमध्ये काही सत्ताधारी व्यक्तींच्या पत्नी आहेत तर काही त्यांच्या नातेवाईक आहेत. काही व्हिडीओ पाहिल्यावर असे दिसते की, ते रेकॉर्ड केले जात असल्याची जाणीव महिलांना होती. एनगोंगा हा राष्ट्राध्यक्ष टिओडोरो ओबियांग नुमा यांचा पुतण्या व प्रतिस्पर्धी आहे. भविष्यात राष्ट्राध्यक्ष नुमा यांच्याऐवजी त्यांचा पुतण्या एनगोंगा पुढील राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो, असा विचार करून कोणीतरी मुद्दाम हे व्हिडीओ लीक केले असण्याची शक्यता आहे. हे व्हिडिओ आणि फोटो कुठून आले याचा तपास सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष टिओडोरा ओबियांग नुमा 1979 पासून इक्वेटोरियल गिनीमध्ये सत्तेवर आहेत. जगातील सर्वात जास्त काळ राष्ट्राध्यक्ष राहिलेले ते नेते आहेत.