प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

North Korean Troops Addicted to Porn: पूर्व आशियामध्ये असलेल्या उत्तर कोरियाबद्दल (North Korea) सोशल मीडियावर खूप चर्चा होते. मात्र जग आपल्याबाबत काय बोलत आहे ते उत्तर कोरियातील लोकांपर्यंत पोहोचत नाही, कारण उत्तर कोरियामध्ये इंटरनेटचा वापर मर्यादित आहे. याचा अर्थ लोकांना मुक्तपणे इंटरनेट वापरता येत नाही. उत्तर कोरियामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर बंदी आहे. उत्तर कोरियामध्ये सर्वसामान्य जनता केवळ सरकारद्वारे पुरवलेले इंटरनेटच वापरू शकते, आणि त्यावरही सरकारचे लक्ष असते.

याचा अर्थ उत्तर कोरियाच्या सरकारला लोक त्यांच्या फोनवर कोण काय पाहत आहे याबद्दल सर्व काही माहित आहे. उत्तर कोरियामध्ये पॉर्नवर (Porn Videos) बंदी आहे. पॉर्न पाहताना पकडले तर सरकार कठोर शिक्षा देते. म्हणूनच अलीकडे जेव्हा उत्तर कोरियाचे सैनिक रशियात गेले तेव्हा त्यांना अनिर्बंध इंटरनेटची सुविधा मिळाली. त्यामुळे त्यांना चक्क पॉर्नचे व्यसन जडले. आपल्या देशात पॉर्न पाहायला मिळत नसल्याने हे सैनिक इथे खूप पॉर्न पाहत आहेत. (हेही वाचा: Social Media To Be Banned for Children Under 16: ऑस्ट्रेलियात 16 वर्षां)

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची परिस्थिती आहे, दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. या युद्धात जगातील विविध देश वेगवेगळ्या देशांना पाठिंबा देत आहेत. या युद्धात उत्तर कोरिया रशियासोबत आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी आपली मदत पाठवली आहे. युक्रेनच्या सैन्याशी लढण्यासाठी उत्तर कोरियाची तुकडी कुर्स्क भागात दाखल झाली आहे. जेव्हा उत्तर कोरियाचे सैनिक रशियात पोहोचले, तेव्हा त्यांना अमर्याद अनिर्बंध इंटरनेट सुविधा मिळाली. ही इंटरनेटची सुविधा मिळताच हे सैनिक मोठ्या प्रमाणावर पॉर्न पाहू लागले.

उत्तर कोरियाच्या सैनिकांनी इतके पॉर्न पाहिले की त्यांना आता त्याचे व्यसन लागले आहे. रशिया आणि युक्रेनमधील या युद्धात उत्तर कोरियाचे 7000 हून अधिक सैनिक भाग घेत आहेत. हे सर्व सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात आहेत. त्यांच्याकडे रायफल, मोर्टार राऊंड आणि अनेक प्रकारची आक्षेपार्ह शस्त्रे आहेत. या सर्व सैनिकांना रशियामध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते, जेणेकरून ते युद्धात जोरदारपणे लढू शकतील. मात्र इथे सैनिक ऑनलाइन अश्लील सामग्रीच्या आहारी गेले आहेत.