अमेरिकेतील (America) न्यूयॉर्कमधून (New York) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने रेस्टॉरंटला (Restaurant) केवळ त्याच्या कर्मचाऱ्यांनी चिकन बिर्याणी देण्यास नकार दिल्याने आग लावली. ही संपूर्ण घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी रेस्टॉरंटला आग लावताना दिसत आहे. 49 वर्षीय चोफेल नोरबू (Chofel Norbu) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, आरोपी चिकन बिर्याणी खाण्यासाठी चोफेल शहरातील जॅक्सन हाइट्स भागात असलेल्या बांगलादेशी रेस्टॉरंटमध्ये पोहोचला होता.
नशेत असल्यामुळे रेस्टॉरंटने त्याला चिकन बिर्याणी दिली नाही, असा त्याचा दावा आहे. यावर तो चांगलाच संतापला आणि त्याने रेस्टॉरंटच्या मालकाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. आरोपींनी दुसऱ्या दिवशी रात्री रेस्टॉरंटला आग लावली. न्यूयॉर्क अग्निशमन विभागाने याचा एक व्हिडिओ जारी केला आहे, जो व्हायरल झाला आहे. यामध्ये 49 वर्षीय चोफेल रेस्टॉरंटजवळ उभा असताना त्यावर ज्वलनशील द्रव फवारून त्याला आग लावताना दिसत आहे.
View this post on Instagram
मात्र, यादरम्यान तो स्वत:ही आगीच्या भक्ष्यस्थानी येतो. आरोपी चोफेल म्हणाला, 'मी खूप नशेत होतो. मी रेस्टॉरंटमध्ये चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली. मात्र कर्मचाऱ्यांनी मला ते देण्यास नकार दिला. तो पुढे म्हणाला, 'मला रेस्टॉरंटच्या कारवाईचा राग आला. मी गॅसचा कॅन घेतला. त्यानंतर रेस्टॉरंटच्या गेटवर शिंपडून आग लावली. न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंट बंद झाल्यानंतर चोफेल ज्वलनशील द्रव घेऊन आला. मग संधी साधून त्याच्या गेटला आग लावली. मात्र यावेळी तो स्वतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.