Elon Musk's New Girlfriend: सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क अभिनेत्री Natasha Bassett ला डेट करत असल्याची चर्चा; जाणून घ्या या ऑस्ट्रेलियन अभिनेत्रीबाबत (See Pics) 
Elon Musk, Natasha Bassett. (Photo Credits: Facebook | Instagram)

तब्बल 233 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) हे SpaceX आणि Tesla चे सीईओ आहेत. मस्क हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता ते एका तरुणीसोबत स्पॉट झाल्याने चर्चेत आले आहेत. हे जोडपे अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये मस्क यांच्या खाजगी जेटमधून बाहेर पडताना दिसले होते व त्यानंतर ही ‘मिस्ट्री वूमन’ कोण आहे याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. त्यावेळी एक लांब काळा ट्रेंच कोट आणि सनग्लासेस घालून ही महिला तिची ओळख लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली होती.

मात्र आता माहिती समोर आली आहे की, ही महिला ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नताशा बसेट (Natasha Bassett) आहे. एलोन मस्क सध्या 50 वर्षांचे आहेत व त्यांची ही नवी गर्लफ्रेंड 24 वर्षांची आहे. India.com ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नताशाचा जन्म 29 डिसेंबर 1997 रोजी सिडनीमध्ये झाला. इथेच ती लहानाची मोठी झाली. वयाच्या 14 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन थिएटर फॉर यंग पीपलसह रोमिओ आणि ज्युलिएटमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Natasha Bassett (@natashabassett)

2019 मध्ये ती न्यूयॉर्कच्या ड्रामा स्कूलमध्ये दाखल झाली. नताशा गेल्या एक दशकाहून अधिक काळ ती चित्रपटसृष्टीत काम करत आहे. बॅसेटने गायिका म्हणूनही काम केले आहे. अभिनेत्री आता दिवंगत गायक एल्विस प्रेस्लीच्या आगामी बायोपिकमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती प्रेस्लीची पहिली गर्लफ्रेंड डिक्सी लॉकची भूमिका साकारत आहे. सध्या ती लॉस एंजेलिसमध्ये राहते. एलोन मस्कने गेल्या वर्षी मार्चमध्ये आपल्या आधीच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केले होते आणि आता फेब्रुवारी महिन्यात मस्क यांची नवी गर्लफ्रेंड जगासमोर आली आहे. (हेही वाचा: Tesla चे भविष्य धोक्यात! भारत सरकारने फेटाळली Elon Musk यांची आयात शुल्कात सूट देण्याची मागणी)

 

View this post on Instagram

 

A post shared by Natasha Bassett (@natashabassett)

 

View this post on Instagram

 

A post shared by Natasha Bassett (@natashabassett)

नताशापूर्वी एलोन मस्क कॅनेडियन इलेक्ट्रॉनिक पॉप सिंगर बेबी ग्रिम्ससोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघे जवळपास 3 वर्षे एकत्र होते. एलोन मस्कला ग्रिम्सपासून एक मुलगा आहे, ज्याचे नाव X A-Xii ठेवले आहे. मास्क यांची याआधी तीन लग्ने झाली असून त्यांना एकून 7 मुले आहेत.