Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानात (Afghanistan) शनिवारी भूकंपाचे (Earthquake) 3 जोरदार धक्के जाणवले. ज्यांची तीव्रता 6.3, 5.9 आणि 5.5 होती. भूकंपामुळे 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तालिबानच्या प्रवक्त्याने माहिती दिली की, पश्चिम अफगाणिस्तानात झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृतांची संख्या 2,000 झाली आहे.
भूकंपामुळे 465 घरे उद्ध्वस्त झाली असून 135 घरांचे नुकसान झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. यावेळीही अनेक लोक कोसळलेल्या इमारतीखाली अडकले असण्याची शक्यता आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या वायव्येस सुमारे 40 किलोमीटर (25 मैल) होता. (हेही वाचा - Israel-Hamas War: युद्धक्षेत्रात राहणाऱ्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी; भारताच्या प्रतिनिधी कार्यालयाने केलं आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करण्याचं आवाहन)
#AFG Heartbreaking news from Herat province in western Afghanistan,🇦🇫.A 6.2 magnitude earthquake has claimed at least 30 lives&left at least 1000 injured. The challenges of poverty and governance were already burdensome. Now, this natural disaster adds another layer of adversity. pic.twitter.com/cwslh6eDBO
— BILAL SARWARY (@bsarwary) October 7, 2023
लोकांच्या मते, अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे पाच धक्के जाणवले. हेरातचे रहिवासी अब्दुल शकोर समदी यांनी सांगितले की, दुपारच्या सुमारास किमान पाच भूकंपाचे धक्के जाणवले. समदी म्हणाले की सर्वजण घराबाहेर पडले. घरे, कार्यालये, दुकाने सर्व रिकामे आहेत. भूकंपाचा धक्का जाणवला तेव्हा मी आणि माझे कुटुंब आमच्या घरात होतो.