Earthquake in Philippines: फिलिपाइन्समध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. फिलिपाइन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मोलॉजीने सांगितले की, शनिवारी सकाळी फिलिपाइन्सच्या दक्षिण भागात ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.मात्र, भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.शिन्हुआ वृत्तसंस्थेने फिलिपाइन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मॉलॉजीच्या हवाल्याने म्हटले आहे की, स्थानिक वेळेनुसार सकाळी 6:22 वाजता भूकंप झाला. मिंडानाओ भागातील अनेक प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले. यामध्ये अगुसान डेल सुर, दावो डी ओरो, दावो सिटी, दावो ऑक्सीडेंटल आणि मध्य फिलीपिन्समधील काही भागांचा देखील समावेश आहे. हेही वाचा: Philippines Taal Volcano: फिलीपिन्समधील 'ताल' ज्वालामुखी उद्रेकाच्या मार्गावर; सरकारकडून हाय अलर्ट जारी, हजारो लोकांचे स्थलांतर
टेक्टोनिक भूकंपानंतर आफ्टरशॉक जाणवतील, पण त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, असे संस्थेने म्हटले आहे. फिलीपिन्स हे पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. त्यामुळे येथे नेहमी भूकंपाचे धक्के जाणवत असतात.यापूर्वी 11 जुलै रोजी फिलिपाइन्सच्या दक्षिणेकडील सुलतान कुदारात प्रांतात 7.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.13 वाजता भूकंप झाला. ते 722 किलोमीटर खोलीवर आणि पालेमबांगच्या किनारी शहराच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 133 किलोमीटर अंतरावर होते.