अमेरिका आणि इराण मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोनं 45 हजारांवर जाण्याची शक्यता
Gold Rate (Photo Credits: Wikimedia Commons)

अमेरिका आणि इराण मधील तणाव आता हळूहळू गंभीर रुप धारण करु लागलय. हे असेच चालू राहिले तर लवकरच मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळण्याची शक्यता आहे. परिणाम स्वरुप सोने 45,000 वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्याने मध्य पूर्वेतील राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर बाजारात घसरण होत असून गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे आकर्षित होतील. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या हवाई हल्ल्याने मध्य पूर्वेतील राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर बाजारात घसरण होत असून गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे आकर्षित होतील.

अमेरिका आणि इराण देशाचे एकमेकांवर हल्ले सुरु असून त्याचा परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवर होत आहे. परिणामी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज म्हणजे एमसीएक्सवर सोन्याचा दर 39 हजार 920 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. सराफा बाजारात सोने 870 रुपयांनी महागले आणि भाव 41 हजारांवर पोहचला आहे. सोने आणि इतर मौल्यवान धातूंच्या किमतीतमध्ये देखील वाढ झाली. ज्यात चांदी 0.5 टक्के, प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी वधारले.

हेदेखील वाचा- बगदादः अमेरिकेकडून पुन्हा एअरस्ट्राईक, 6 जणांचा मृत्यू

अमेरिकेने शनिवारी सकाळी बगदादमध्ये (Baghdad) पुन्हा एकदा हवाई हल्ला (Airstrike) केला आहे. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेने शुक्रवारी बगदादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी (General Qassem Soleimani) याच्यासह 8 जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेने आज बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ईराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबी याचा मृत्यू झाला आहे. हश्द अल शाबी हा ईराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे. या हवाई हल्ल्यात 2 वाहनांवर निशाणा साधण्यात आला. त्यामुळे या वाहनातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.