संयुक्त अरब अमीरात (UAE) चे अरबपति शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम (Sheikh Mohammed bin Rashid al Maktoum) यांची सहावी राणी हया बिंत अल हुसेन (Haya bint al-Hussein) आपल्या दोन मुलांना आणि जवळपास 271 कोटी रुपये घेऊन दुबई सोडून पळून गेली आहे. शेख मुहम्मद यूएईचे उप राष्ट्रपति आणि पंतप्रधान आहेत. असे मानले जात आहे की ती लंडनमध्ये लपलेली आहे. जॉर्डनचे शाह अब्दुल्ला यांची सावत्र बहिण हयाला आपल्या पतीपासून घटस्फोट हवा आहे. याआधी देखील तीने आपली मुले जलीला (11 वर्षे) आणि जाएद (7 वर्षे) सह स्वतःला जर्मनी मध्ये राजकीय शरण मिळावे असे अपील केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळी हयाने पळून जाताना स्वतःबरोबर 31 मिलियन पौंड इतकी तगडी रक्कम घेतलेली आहे. असे सांगितले जाते की या रकमेद्वारे तिला स्वतःचे नवीन जीवन सुरु करायचे आहे. 20 मे पासून हयाला सार्वजनिकरित्या कोणीही पहिले नाही. सोबतच तिचे सोशल मिडिया अकाउंट्स देखील फेब्रुवारी पासून अपडेटेड नाहीत. अरब मिडीयाने दिलेल्या वृत्तानुसार यावेळी तिला जर्मनीने पळून जाण्यासाठी मदत केली आहे. (हेही वाचा: भारतीय तरुणाला दुबई येथे तब्बल 19 कोटींची लॉटरी)
याआधी शेख ची एक मुलगी लतीफा नेही घरातून पळून जाण्याचा असफल प्रयत्न केला होता. लतीफाला गोवा जवळ भारतीय तटबंदी सीमा तटरक्षक दलाने पकडले होते. त्यानंतर तिची कोणतीही माहिती समोर आली नाही. लतीफाला घरात शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे तिने सांगितले होते. दरम्यान हयाने आपले शिक्षण ऑक्सफोर्ड मधून पूर्ण केले आहे. हया आपल्या संसारिक जीवनात आनंदी नसल्याने तिने हा पाऊल उचलले आहे.