US President Donald Trump Meets Pakistan PM Imran Khan. (Photo Credits: ANI)

'हाऊडी मोदी' कार्यक्रमादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आज अमेरिकेमध्ये भेट घेणार आहेत. मात्र या भेटीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी जर भारत आणि पाकिस्तानची इच्छा असेल तर अमेरिका कश्मीर प्रश्नी मध्यस्थाची भूमिका बजावण्यास तयार असल्याचं सूचक विधान केलं आहे. अमेरिकेमध्ये सोमवारी (23 सप्टेंबर) पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानसोबत (Imran Khan) डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळेस पत्रकार परिषदेदरम्यान उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. सोबतच कश्मीर हा नाजूक प्रश्न आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शांतपणे चर्चा करणं गरजेचे आहे. मात्र त्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमरान खान यांनी तयारी दाखवल्यास आपण मदत आणि मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदीं यांच्याकडून पाकिस्तानला सूचक इशारा; म्हणाले, दहशतवादाविरोधात ट्रम्प आमच्यासोबत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले भारत- पाकिस्तान सोबत उत्तम संबंध आहे. तसेच स्वतः उत्तम मध्यस्थ ठरू शकतात अशा विश्वास दर्शवताना त्यांनी यापूर्वी अनेक मोठे प्रश्न त्यांच्या मध्यस्थीने अधिक चांगल्या रीतीने हाताळल्याने त्यामधून मार्ग काढू शकल्याचंही म्हटलं आहे. मात्र भविष्यात भारत - पाकिस्तान या दोन्ही देशांकडून त्याबाबत सहमती दर्शवल्यास कश्मीर सारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मदत करण्यास तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र यावर अद्याप भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. European Union Parliament चा कश्मीर प्रश्नावरून भारत- पाकिस्तान देशांना सबुरीचा सल्ला; संयमाने चर्चा करून तोडगा काढण्याचं आवाहन.

ANI Tweet

Willing to mediate on Kashmir issue if India, Pak agree: Donald Trump

रविवार, (23 सप्टेंबर) दिवशी अमेरिकेच्या ह्युस्टन शहरामध्ये 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळेस नरेंद्र मोदींसह अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सहभाग घेत भारतीय समुदायाला उद्देशून भाषण केलं होतं. आज दुपारी 12.15 च्या सुमारास न्यूयॉर्कमध्ये मोदी - ट्र्म्प यांची भेट होणार आहे. सध्या मोदी आठवडाभर अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत.