भारत - पाकिस्तान (India - Pakistan) देशांमध्ये सध्या मागील काही दिवसांपासून तणावग्रस्त स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून हा ताण मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या युरोपियन युनियन संसदेमध्येही (European Union Parliament) भारत-पाक संबंधांवर चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही देशांसाठी चिंतेचा बनलेला हा मुद्दा आता सोडवण्यासाठी चर्चा करावी असा उपाय युरोपियन युनियन संसदेकडून सूचवण्यात आला आहे.
युरोपियन युनियन संसदेमध्ये 17 सप्टेंबर दिवशी भारत - पाक संबंधांवर चर्चा झाली. मागील 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच युरोपीय देशांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. युरोपियन कमिशनच्या व्हाईस प्रेसिडंट Federica Mogherini यांच्या वतीने युरोपियन मंत्री Tytti Tuppurainen यांनी दिलेल्या माहितीनुसार आता कश्मीरमध्ये कोणीही यापेक्षा अधिक घडामोडी सहन करू शकत नाही. त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना शांतता, संयम राखत राजकीय मध्यस्थी करण्याचे आवाहन केले आहे. लाईन ऑफ कंट्रोलच्या दोन्ही बाजूला असणार्या नागरिकांचे हित लक्षात घेता भारत आणि पाकिस्तान देशाने आपली पुढील भूमिका घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.
ANI Tweet
The European Union Parliament has called on India and Pakistan to engage in direct dialogue on Kashmir to ensure a peaceful resolution to the issue. pic.twitter.com/BXSCGyscfp
— ANI (@ANI) September 18, 2019
भारत-पाकमधील ही तणावग्रस्त स्थिती दूर करण्यासाठी, दोन्ही प्रांतामध्ये असुरक्षितता आणि अस्थिरता कमी करण्यासाठी एकमेकांशी शांतपणे चर्चा करणं यामध्येच सार्यांचे हित आहे. सार्यांनाच अत्यावश्यक सेवा, दोन्ही बाजूने संवाद साधण्याची पूर्ण संधी मिळणं आवश्यक आहे. या स्थितीवर युरोपीयन युनियन लक्ष ठेवून राहणार आहे. भारताकडून कलम 370 रद्द केल्यानंतर मागील महिन्याभरापासून कश्नीर भागामध्ये तणावपूर्ण शांताता आहे. काही भागात सैन्य अजूनही तैनात करण्यात आला आहे.