अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प यांचा मोठा मुलगा Donald Trump Jr ला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉनल्ड ट्र्म्प ज्युनियर यांना आठवड्याच्या सुरूवातीला कोरोनाची लागण (Coronavirus) झाली असून ते सध्या त्यांच्या कॅबिन जवळच क्वारंटीनमध्ये आहेत. दरम्यान ते असिम्प्टमेटिक असून त्यांच्यावर डॉक्टरांचे लक्ष आहे. कोविड 19 (COVID 19) शी संबंधित सार्या मेडिकल गाईडलाईंसचं पालन केले जात आहे अशी माहिती देखील त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
ट्र्म्प कुटुंबामध्ये सध्या डॉनल्ड ट्र्म्प ज्युनियर यांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. ते 42 वर्षीय आहेत. ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचाराच्या धामधुमीमध्ये स्वतः डॉनल्ड ट्रम्प, त्यांच्या पती मेलिनिया ट्र्म्प आणि मुलगा बॅरन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. डॉनल्ड ट्रम्प यांना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रचाराच्या वेळी डॉनल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. कोरोना व्हायरस चा संसर्ग झाल्यानंतर US President Donald Trump यांनी शेअर केला व्हिडिओ; पहा काय म्हणाले.
सध्या जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे अमेरिकेमध्ये आहेत. आतापर्यंत अमेरिकेमध्ये 2,53,000 पेक्षा अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. तर 1.17 कोटी पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण देखील झाली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनावरील लसीचं काम अंतिम टप्प्यात आहे. फायझर कंपनीने त्यांची लस 95% प्रभावी असल्याचं सांगत त्यांच्या वापरासाठी आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज केला आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने मंजुरी दिल्यास डिसेंबर 2020 मध्ये ते लस बाजारात आणून सामान्यांच्या लसीकरणाला सुरूवात करणार आहेत.