संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनाही झाला आहे. त्यांच्यावर सध्या वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये (Walter Reed Medical Center) उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तसंच अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी मला लवकरच परत यायचे आहे, असेही ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार Hope Hicks यांना कोविड-19 (Covid-19) ची लागण झाल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलिनिया ट्रम्प (Melania Trump) यांनी खबरदारीच्या दृष्टीने कोरोनाची चाचणी करुन घेतली होती. त्यानंतर दोघांचेही अहवाल पॉझिटीव्ह आले होते.
कोरोना व्हायरस संसर्गावर उपचार घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉस्टिपलमधून एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत त्यांंनी म्हटले की, "आता मला खूप बरे वाटत आहे. सर्व काही सुरळीत करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत. मला परत यायचे आहे कारण अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवायचे आहे." (US अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलेनिया यांनी कोविड-19 ची लागण; 'बाबा' विरेंद्र सेहवाग म्हणतो...गो करोना गो!)
Donald Trump Video:
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 3, 2020
दरम्यान, ट्रम्प यांच्या पत्नी मेलिनिया यांचीही प्रकृती चांगली आहे. त्यांना केवळ खोकला आणि डोकेदुखी होत असल्याचे Dr Conley यांनी सांगितले आहे, तर ट्रम्प यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी देखील निगेटीव्ह आली आहे. (कोरोना व्हायरस चा संसर्ग झाल्यानंतर US President Donald Trump यांनी शेअर केला व्हिडिओ; पहा काय म्हणाले)
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचे आव्हान आहे. त्यामुळे कोरोना संसर्गातून लवकर बरे होऊन ट्रम्प यांना निवडणूकीच्या तयारीसाठी परतायचे आहे.