Amazon News: ब्राझिलमध्ये असलेल्या अॅमेझॉन येथे जवळपास 100 डॉल्फिन मृतावस्थेत (Dolphins Dead) आढळून आले आहेत. सरासरी पेक्षा अधिक प्रमाणात झालेल्या तापमानवाढीमुळे पाठिमागील सात दिवसांमध्ये हे मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. सातत्याने होणारा पर्यावरण बदल तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहे. वृत्तसंस्था एएनआयने सीएनएनचा हवाला देत दिलेल्या वृत्तामध्ये या ठिकाणी तब्बल102 अंश फॅरेनहाइट तापमानाची नोंद झाल्याचे म्हटले आहे. ब्राझीलीयन विज्ञान मंत्रालयाद्वारे अर्थसहाय्यित संशोधन आणि सुविधा केंद्र असलेल्या ममिरौआ संस्थेने म्हटले आहे की, ही घटना टेफे सरोवरात घडली.
सातत्याने वाढत असलेले तापमान आणि दुष्काळसदृश्य स्थिती यामुळे निर्माण होणाऱ्या तातडीच्या बदलांना सामोरे जाण्यास डॉल्फिन सक्षम नसतात. परिणामी निसर्गामध्ये होणाऱ्या ऐतिहासीक बदलामुळे त्यांच्यावर मृत्यूची कुऱ्हाड कोसळते आहे. एकाच वेळी इतक्या प्रमाणात होणाऱ्या मृत्यूची घटना ही असमान्य आहे. म्हणूनच ती गंभीरही आहे. जगातील सर्वात मोठा जलमार्ग असलेली एमेझॉन नदी, ही जगातील सर्वात मोठी म्हणून ओळखले जाते. पण, ती सुद्धा सततचा दुष्काळ आणि ऐतिहासिक पर्यावरणीय बदल यामुळे कोरडी पडू लागली आहे. परिणामी या जलमार्गातील इतरही प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, या सर्व मृत्यूंबाबत लवकरच चौकशी केली जाणार आहे. ज्यामुळे डॉल्फिनबाबत आणखी माहिती मिळू शकेल. सविस्तर अहवाल आल्यानंतरच अधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे सीएनएनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, संस्थेने म्हटले आहे की, तज्ज्ञांच्या अभ्यासानंतर बरीच माहिती पुढे येऊ शकणार आहे. मात्र, सध्या तरी दुष्काळ आणि तापमानवाढ इतकेच कारण पुढे येत आहे. काही तज्ज्ञांनी नदीची पाणीपातळी वाढेपर्यंत आणि तापमान कमी होईपर्यंत डॉल्फिनला इतर ठिकाणी स्थानांतरीत करावा असाही मुद्दा मांडला आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न सुर आहेत.
ट्विट
Over 100 dolphins dead in Amazon as it hits record-high temperature
Read @ANI Story | https://t.co/TZwePHEKGY#Dolphins #BrazilianAmazon #Amazon pic.twitter.com/FHBC2D0Ghm
— ANI Digital (@ani_digital) October 2, 2023
दरम्यान, ममिरौआ इन्स्टिट्यूटचे संशोधक आंद्रे कोएल्हो यांनी सीएनएन ब्राझीलला सांगितले की, "रिव्हर डॉल्फिनला इतर नद्यांमध्ये स्थानांतरित करणे तितकेसे सुरक्षित नाही. कारण (प्राण्यांना जंगलात सोडण्यापूर्वी) त्यांना अनोख्या ठिकाणी स्थानांतरीत करते वेळी तिथले वातावरण, इतर प्राणी, जिवाणू-विषाणू आणि स्थितीचा आढावा घ्यावा लागतो. शिवाय, सुमारे 59 नगरपालिकांनी Amazonas राज्यातील पाण्याची पातळी सरासरीपेक्षा कमी नोंदवली आहे.ज्यामुळे नदीवरील वाहतूक आणि मासेमारी या दोन्ही गोष्टींमध्ये अडथळा निर्माण होत आहे