Dolphin In Juhu Beach: मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन मासा
The dolphin washed ashore Juhu beach (Photo credits: Video grab/ Representational Image)

मुंबईच्या (Mumbai) जुहू समुद्र किनाऱ्यावर (Juhu Beach) शुक्रवारी सकाळी एक डॉल्फिन (Dolphin) मृत (Dead) अवस्थेत सापडल्याची माहिती एका नागरी अधिकाऱ्याने दिली आहे. काही स्थानिक रहिवाशांनी जुहू चौपाटीवर मृत डॉल्फिन पाहिला आणि त्याबाबत स्थानिक नागरी अधिकाऱ्यांना कळवले. यानंतर त्यांनी वनविभागाला कळवले,अशी माहिती बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) अधिकाऱ्याने दिली. वनविभागाने (Forest Department) नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे. वन अधिकाऱ्यांना त्या डॉल्फिनच्या प्रजातींची (Species of dolphins) अचूक माहिती असू शकते .पीटीआयशी बोलताना स्थानिक नगरसेविका रेणू हंसराज म्हणाल्या की, शुक्रवारी सकाळी सापडलेली डॉल्फिन नेहमीच्या आकारापेक्षा लहान होती. पूर्वी शहराच्या समुद्र किनाऱ्यांवर सापडलेल्या डॉल्फिनच्या मृतदेहाच्या तुलनेत हा विशिष्ट डॉल्फिन आकाराने लहान होता, असे नगरसेवक म्हणाले.

या वर्षाच्या सुरुवातीला, काही मृत डॉल्फिन शहराच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगळ्या ठिकाणी किनाऱ्यावर आढळल्या होत्या. जरी डॉल्फिन माशांसारखे दिसतात, तरी त्यांना समुद्री सस्तन प्राणी म्हणून वर्गीकृत केले जाते. दरम्यान याधीही अशा प्रकारचे मोठे मासे किनाऱ्यावर आढळले आहेत. अशा घटना समोर ही आल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाही काही मृत डॉल्फिन मुंबईच्या किनारपट्टीवरून दिसून आले आहेत.