David Hole Rock: ऑस्ट्रेलियातील व्यक्तीस मिळाली अशी वस्तू, जी आहे अब्जावधी वर्षांपूर्वीची
David Hole Rock | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ऑस्ट्रेलियातील (Australia) एका व्यक्तीचे नशीब एका दगडाने उघडले आहे. ज्याची सोशल मीडियावर भलतीच चर्चा आहे. ऑस्ट्रेलियातील हा व्यक्ती मेलबर्न (Melbourne) येथील राहणारा आहे. डेव्हिड होल (David Hole) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याला एक अशी वस्तू सापडली आहे. जी इतकी मौल्यवाण असेल याची त्यालाही कल्पना नव्हती. विशेष म्हणजे ही वस्तू सोने किंवा सोन्याचा दगड असेल असे त्याला वाटले होते. परंतू, ही वस्तू सोन्यापेक्षाही मौल्यवान निघाली. होय, अर्थात हा एक प्रकारचा दगडच आहे. पण तो या ग्रहावरील नाही. अब्जावधी वर्षांपूर्वी आंतराळातून पृथ्वीवर आलेल्या उल्केतील (Meteorite) हा एक दगड आहे.

द मिररने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, ज्या व्यक्तीला हा दगड सापडला आहे त्याचे नाव डेव्हीड होल असे आहे. सन 2015 मध्ये डेव्हिड होल याला एक पिवळ्या रंगाचा दगड मिळाला होता. हा दगड त्याला मॅरीबोरो रिजनल पार्क (Maryborough Regional Park , Melbourne) येथे मिळाला. प्राप्त माहितीनुसार, 19 व्या शतकापासून या परिसरात सोने किंवा सोन्याचा अंश असलेले दगड मिळणे अगदी सर्वसाधारण झाले होते. मात्र, डेव्हिड होल याला सापडलेला दगड हा काहीसा वेगळा होता. त्याने हा दगड जवळपास 6 वर्षांपर्यंत स्वत:कडेच बाळगला.

दरम्यान, या दगडाबाबत अधिक उत्सुकता वाढल्याने एके दिवशी त्याने हा दगड फोडण्याचा प्रयत्न केला. पण अनेक प्रयत्न करुनही त्याला हा दगड किंचीतही फुटला किंवा तुटला नाही. अखेर हा दगड घेऊन तो जवळच्या संग्रहालयात गेला. त्याने संग्रहालयातील अभ्यासकांना हा दगड दाखवल्यानंतर तेही आश्चर्यचकीत झाले. अभ्यासकांनी सांगितले की, हा दगड अब्जावधी वर्षांपूर्वीचा आहे. हा दगड एक प्रकारची उल्का आहे. सिडनी मॉर्निंग हेरॉल्डशी चर्चा करताना संग्रहालयाचे वैज्ञानिक डेरमोट हेनरी यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ दोनच अस्सल उल्का दगड प्राप्त झाले आहेत.