COVID19 Vaccine: अमेरिकेत आता 5-11 वयोगटातील मुलांना सुद्धा दिली जाणार कोरोनावरील लस, फायजरच्या डोससाठी FDA ची मंजुरी
Vaccine | Representational Image | (Photo Credits: Flickr)

COVID19 Vaccine:  अमेरिकेत आता 5-11 वयोगटातील मुलांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. शनिवारी अमेरिकेच्या FDA ने मुलांच्या लसीकरणासाठी मंजुरी दिली आहे. फायजर-बायोटेक ही पहिली अशी कंपनी बनली आहे ज्याला अमेरिकेच्या एफडीएकडून मुलांना कोरोनावरील लस देण्यास परवानगी दिली आहे. यानंतर फायजर बायोटेकने म्हटले की, लसीचे दोन डोस 21 दिवसांच्या अंतराने दिले जाणार आहेत.(China Lockdonw: चीनमध्ये Covid-19 चा पुन्हा उद्रेक; तब्बल 11 प्रांतांमध्ये पसरला संसर्ग, लॉकडाऊन लागू)

फायजरचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अल्बर्ट बोला यांनी म्हटले की, अमेरिकत 60 लाखांहून अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या व्यतिरिक्त त्यापेक्षा कमी वयातील लोक आणि तरुणांना याला सामोरे जावे लागले आहे. लसीकरणामुळे मुलांना उत्तम सुरक्षितता मिळणार आहे. कोरोनाच्या या लढाईत लस ही आपली मोठी भुमिका पार पाडणार आहे. या लसीमुळे लहान मुले, त्यांचा परिवार आणि समाजाची सुरक्षा होणार आहे.(Covid-19 चाचणी करण्याची आहे ठराविक वेळ; दिवसातील वेळेनुसार बदलू शकतात निकाल- Study)

दरम्यान, लहान मुलांवरील लसीकरण सुरु होण्यापूर्वी अमेरिकेच्या FDA कडून लसीबद्दल अधिक माहिती मंगळवारी घेतली जाणार आहे. त्यानंतरच मुलांवरील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. एफडीए चीफ डॉक्टर पीटर यांनी म्हटले की, कोरोनाच्या महासंकटामुळे फक्त आर्थिकच नव्हे तर सामाजिक नुकसान सुद्धा झाले आहे. लहान मुलांवर कोरोनाचा भयंकर प्रभाव पडला आहे. महारोगामुळे मुलांच्या शारिरिक विकासासह सामाजिक विकासावर ही प्रभाव पडला आहे. तर 5-11 वयोगटातील जवळजवळ 70 टक्के संक्रमित मुलांना कोरोनाच्या गंभीर लक्षणांचा सामना करावा लागला होता. त्याचसोबत अस्थमा आणि अतिलठ्ठपणाच्या आजारांना सुद्धा आमंत्रण दिले गेले.