
जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटी 49 लाख 11 हजार 716 वर पोहोचली आहे. Worldometers ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटींच्या पार गेली असून आतापर्यंत एकूण 8,41,331 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. तर 1,72,99,915 रुग्ण बरे झाले असून त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे. जगभराचा विचार केला असता कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत (US) असून देशात 60,96,235 रुग्ण आढळले आहेत.
Worldometers दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 1 लाख 85 हजार 901 रुग्ण दगावले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 33,75,838 वर पोहोचली आहे. अमेरिकेपाठोपाठ (USA) ब्राझील (Brazil) आणि भारत (India) देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.
जगभरातील कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात मागील 24 तासांत 76,472 नवे रुग्ण आढळून आले असून 1,021 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 34 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सध्या देशात 34,63,973 कोरोना बाधित रुग्ण असून मृतांचा आकडा 62,550 वर पोहचला आहे. त्यापैकी 7,52,424 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 26,48,999 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिली आहे.
सध्या देशात अनलॉकचा तिसरा टप्पा सुरु आहे. लवकरच अनलॉक 4 ला सुरुवात होईल. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात नेमक्या कोणत्या सेवा सुरु होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोनाच्या लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकट काळात प्रवासी मास्क न घालता कोविड-19 (Covid-19) च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांची नो-फ्लाय लिस्ट (No-Fly List) बनवण्याची सूचना नागरी उड्डाण महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) सर्व एअरलाईन्सला दिल्या आहेत.