COVID-19 (Photo Credits: IANS)

मागील 24 तासात अमेरिकेत कोरोनामुळे (Coronavirus In United States) तब्बल 1,225 मृत्यूंची नोंद झाली आहे, यासोबतच जगभरातील सर्व देशांना मागे टाकत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूच्या यादीत अमेरिका (America) पहिल्या स्थानी पोहचली आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा उद्रेक सुरु झाल्यापासून आजपर्यंत अमेरिकेत एकूण 102,798 जणांचा मृत्यू झाला आहे तर एकूण रुग्णांची संख्या 17, 45,606 इतकी आहे. हे आकडे जगातील सर्व देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. अमेरिकेच्या पाठोपाठ ब्राझील (Brazil) मध्ये कोरोनाचे 4 लाख 38 हजार 238 रुग्ण तर रशिया (Russia) मध्ये 3 लाख 79 हजार 51 प्रकरणे आढळून आले आहेत. Coronavirus Update: भारतात कोरोना रुग्ण संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, 7964 नव्या रुग्णांसह कोविड-19 बाधितांची एकूण संख्या 1,73,763 वर

प्राप्त माहितीनुसार, कोरोना व्हायरस रुग्णसंख्येच्या यादीत भारताचा क्रमांक आता ८ वर पोहचला आहे. याआधी 2 लाख 70 हजार 508 रुग्णांसह ब्रिटेन, 2 लाख 37 हजार 906 रुग्णांसह स्पेन, 2 लाख 31 हजार 906 रुग्णांसह इटली, 1 लाख 86 हजार 384 रुग्णांसह फ्रान्स, 1 लाख 82 हजार 196 रुग्णांसह जर्मनी या देशांचा क्रमांक आहे. तर 1 लाख 73 हजार 763 रुग्णांसह भारत आठव्या स्थानी आहे. यापाठोपाठ 1 लाख 60 हजार 979 रुग्णांसह तुर्की, 1 लाख 43 हजार 849 रुग्णांसह इराण आणि 1 लाख 41 हजार 779 रुग्णांसह पेरू या देशांचा क्रमांक आहे.

ANI ट्विट

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 58 लाख रुग्ण एकूण आढळले आहेत, या व्हायरसने जगात आतापर्यंत 3 लाख 60 हजार हुन अधिक बळी घेतले आहेत.