Coronavirus: रशियाचे उपराष्ट्राध्यक्ष Yury Trutnev कोरोना व्हायरस संक्रमित
Yury Trutnev | (Photo Credits: YouTube)

रशियाचे (Russia) उपराष्ट्राध्यक्ष यूरी ट्रुटनेव (Yury Trutnev) यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. वृत्तसंस्था सिन्हुआने याबाबत वृत्त दिले आहे. उप राष्ट्राध्यक्ष युरी ट्रुटनेव (Russia's Deputy Prime Minister Coronavirus Positive) यांना पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांच्या दौऱ्यापूर्वी पूर्वेकडील देशांच्या दौऱ्यावर जायचे होते. मात्र आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. यूरी ट्रुटनेव यांच्यावर उपचार सुरु आहेत.

यूरी ट्रुटनेव यांनी म्हटले आहे की, त्यांची कोरोना व्हायरस चाचणी झाली. त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. रिपोर्ट पॉझिटीव्ह येताच यूरी ट्रुटनेव रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी क्वारंटाइन व्हावे आणि गरज पडल्यास कोरोना व्हायरस चाचणी करुन घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, US Presidential Election 2020: अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार Kamala Harris नेमक्या कोण? जाणून घ्या त्यांचा भारताशी संबंध ते राजकीय कारकीर्दीचा आढावा)

दरम्यान, गेल्या 24 तासामध्ये रशियाध्ये कोरोना व्हायरस संक्रमित 5,102 रुग्ण आढळले आहेत. रशियातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 902,701 इतकी आहे. रशियामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 15,231 इतकी झाली आहे.