Coronavirus | Photo Credits: Pixabay.com

चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने आपले जगभरात जाळे पसरवले आहे. त्यामुळे अमेरिका, इटली सारख्या अन्य बड्या देशांना कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. या देशांमध्ये कोरोनाबाधितांसह बळींचा आकडा सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे. तर अमेरिका (US) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनकडून कोरोना व्हायरसची उत्पत्ती करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार केला आहे. याच दरम्यान आता अमेरिकेत गेल्या 24 तासात 922 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेत एकूण कोरोनामुळे मृतांचा आकडा 1,09,042 वर पोहचल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आता असा दावा केला आहे की, त्यांच्या देशाने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी एक व्हॅक्सिन बनवण्यात यश प्राप्त केले आहे. अमेरिकेने या व्हॅक्सिनचे 20 लाखांहून अधिक डोज तयार केल्याचे म्हटले आहे. परंतु याच्या सुरक्षितेबाबत तपासणी यशस्वी आल्यानंतर त्याचा उपयोग सुरु करण्यात येणार आहे. अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यस्था असून आम्हीला या महासंकटावर नियंत्रण मिळवण्यास सफल झाल्याचे ही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.(Coronavirus: उघडलेली शाळा बंद करावी लागली, सरकारला निर्णय महागात पडला; 301 जणांना कोरोन व्हायरस लागण, 250 हून अधिक मुले संक्रमित) 

कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे 186 देशांना याचा फटका बसला आहे. कोरोना संबंधित औषधावर संपूर्ण जगाच्या सोबतीने काम करत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आम्ही चीन सोबत सुद्धा काम करत आहोत. परंतु जे काही झाले ते व्हायला नको हवे होते असे ही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.