चीन मध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; Wuhan शहरातून भारतीयांच्या मदतीसाठी AIR India ची विमानं सज्ज!
Coronavirus outbreak | photo used for representation Purpose (Photo Credits: Pixabay)

चीन मध्ये कोरोना व्हायरसचा (Novel Coronavirus) सुरू असलेलं थैमान आता दिवसंदिवस वाढत आहे. आता चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी बोईंग 747 (Boeing 747 Jet) जेट विमान तैनात करण्यात आलं आहे. सध्या चीनमधील वुहान (Wuhan) शहरात सुरू असलेलं थैमान रोखण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 81 वर पोहचली आहे. सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शहर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. (Coronavirus ची लागण चीन पाठोपाठ जपान आणि अमेरिका पर्यंत पोहचली; जाणून या आजारा विषयी खास माहिती).

एअर इंडियाच्या माहितीनुसार, सरकारच्या पुढील आदेशानंतर जेट द्वारा चीनमधून भारतीयांची सुटका करायची का? याचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. सध्या मुंबई सहा देशभरत विविध आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 29,700 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे तर रविवार (26 जानेवारी) पर्यंत सुमारे 137 फ्लाईंट्स तपासण्यात आली आहेत. देशात 7 महत्त्वाच्या विमानतळांवर तपासणी सुरू करण्यात आली असून अद्याप भारतामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेली व्यक्ती दाखल करण्यात आलेली नाही. तसेच मुंबईत आढळलेले दोन्ही संशयित रूग्ण कोरोना व्हायरसचे लागण झालेले नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने केलेल्या ट्वीटनुसार, 137 आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील विमानांतून प्रवास करणार्‍या 29,707 जणांची तपासणी करण्यात आली आहे. आज (27 जानेवारी) दिवशी 22 फ्लाईट्सची तपासणी करण्यात आली आहे मात्र सुदैवाने अद्याप कोणत्याही रूग्णामध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त नाही.

केरळ आणि महाराष्ट्रात सुमारे 100 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले होते. दरम्यान नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या तयारीसाठी आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे हे पाहण्यासाठी आढावा बैठकही घेतली आहे. चीन मध्ये कोरोना व्हायरसची लागण मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे.