Representational Image (Photo Credits: PTI)

जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले असून तब्बल 9 लाख 35 हजार 571 जणांना याची लागण झाली आहे. तसेच 47 हजारापेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगात 47,206 जणांचा मृत्यू या भयंकर अशा कोरोनामुळे झाला आहे. इटली, स्पेन आणि अमेरिका येथे ही दिवसेंदिवस मृतांच्या आकड्यात वाढ होत आहे. मात्र जगातील 1 लाख 94 हजार 260 जणांनी कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. परंतु इटली येथे कोरोनामुळे आतापर्यंत 15,155 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1110,574 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण चीन नंतर सर्वाधिक मृत्यू इटलीत झाल्याची बाब समोर आली आहे.

तर अमेरिकेत 5109 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अमेरिकेत 215,071 वर पोहचली आहे. या प्रकरणी 50005 जणांची प्रकृती अधिक गंभीर असून त्यांच्यावर काळजीपूर्वक उपचार सुरु आहेत. त्याचसोबत स्पेन येथे कोरोना व्हायरसची 110,574 जणांना लागण झाली असून 9387 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र 22 हजार नागरिकांनी कोरोनावर उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे. सर्व प्रथम चीन मधील वुहान शहरातून कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचे जाळे जगभरात पसरले गेले आहे. तर चीनमध्ये एकूण 81,554 कोरोना संक्रमित लोक असून गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांची एक ही नोंद करण्यात आलेली नाही. मात्र येथे 3312 जणांचा मृत्यू आणि 76,238 जणांनी कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.(Coronavirus Outbreak: जगात 7 लाख 54 हजार 948 कोरोना प्रकरणे, तर 36 हजार 571 जणांचा कोरोनामुळे बळी; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती)

दरम्यान, भारतात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले आहेत.याकाळात नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचं प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. सध्या पोलिस, वैद्यकीय यंत्रणा 24 तास नागरिकांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काम करत आहेत. तर भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 1800 च्या पार गेला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी आहे.