Coronavirus: CNN निवेदक Christopher Cuomo  यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह
CNN Anchor Christopher Cuomo | (Photo Credit: Facebook)

CNN या वृत्तवाहिनीचा निवेदक क्रिस्तोफर कुओमो (Christopher Cuomo) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते आपल्या घरातच अलगीकरण कक्षात राहून वर्क फ्रॉम होम करणार आहेत. त्यांचा 'कुओमो प्राइम टाइम' (Cuomo Prime Time) हा कार्यक्रम नियमित सुरु राहणार आहे. वृत्तवाहिनी सीएनएनने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. क्रिस कुमोओ (Chris Cuomo) यांनी आपण मोठ्या धिराणे आणि धाडसाने या संकटाचा सामना करु असे म्हटले आहे.

दरम्यान, क्रिस कुओमो यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहीली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 'सध्याचा काळ हा अतिशय कठीण आणि जटील होत जाणारा आहे. नुकतेच मला कळले आहे की, माझी कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आली आहे. गेल्या काही काळात मला ताप, थंडी वाजणे आणि श्वसनास अडचण अशा आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या होत्या. त्यामुळे मी स्वत:ची चाचणी करुन घेतली असता ती पॉझिटीव्ह आली आहे. मला अपेक्षा इतकीच आहे की, माझ्यामुळे माझी मुलं आणि पत्नी क्रिस्टीना हिला याची लागण झालेली असू नये. या चाचणीनंतर मला स्वत:ला काहीसे आजारी असल्याची भावना होत आहे.' (हेही वाचा, Coronavirus: 'शक्य असेल तर कृपया आम्हाला मदत करा'; न्यूयॉर्कचे गव्हर्नर Andrew Cuomo यांची वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भावनिक साद)

ट्विट

क्रिस कुओमो यांनी न्यू यॉर्क शहरातील Hudson Yards येथील कार्यालयाला शुक्रवारी भेट दिली होती. त्यांनी सोमवारी आपला नेहमीचा प्राइम टाइम कार्यक्रम केला. त्यानंतर त्यांनी आपला भाऊ एंड्र्यू कुओमो यांची भेट घेतली. ते इतरही काही लोकांना भेटले.

एएनआय ट्विट

क्रिस कुओमो यांनी मंगळवारी म्हटले आहे की, मी माझ्या घराच्या तळघरात स्वताला अलगिकरण करुन घेतले आहे. या तळघरातूनच मी माझा कार्यक्रम करणार आहे. आम्ही सर्वजण एकत्र येऊन या आजाराला पराभऊत करु, असेही त्यांनीआपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे.