Coronavirus: ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणयासाठी Sushi Restaurant  पाठवतंय अर्धनग्न बॉडिल्डर, COVID-19 संकट काळातही करतायत हजारो रुपयांची कमाई
Sushi Restaurant | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या संकटामुळे जगभरातील विविध उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. ग्राहकच मिळत नसल्यामुळे अनेकांना आपला व्यवसाय बंद होतो की काय अशी भीती वाटत आहे. मात्र, काही व्यवसायिक मात्र आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर केवळ व्यवसाय टिकवूनच ठेवत नाहीत तर चांगली व्यवसायवृद्धीही करत आहेत. जपानमधील एका उपहारगृहानेही अशीच शक्कल लढवली आहे. सुशी रेस्टॉरंट (Sushi Restaurant) असे या उपहारगृहाचे नाव आहे. ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांसाठी डिलिव्हरी देण्यासाठी हे उपहारगृह आपले बॉडिबिल्डर डिलिव्हीरी बॉय वापरत आहे. हे बॉडिबिल्डर डिलिव्हरी बॉय अर्धनग्न अवस्थेतील आपल्या पिळदार शरीरशौष्ठवाचे दर्शन घडवत ऑर्डची डिलिव्हरी करत आहेत.

सुशी रेस्टॉरंटने म्हटले आहे की, कोविड 19 संकट काळात ग्राहकांचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे व्यवसायातील तोटा भरुन काढायचा तर काहीतरी नवी संकल्पना राबवायला हवी. त्यामुळे आम्ही 'डिलिव्हरी माचो' (Delivery Macho) ही संकल्पनाराबवली आहे. इमाझुशी शेफ मसानोरी सुगीउरा (Imazushi chef Masanori Sugiura) यांनी ही संकल्पना राबवली आहे. जवळपास 41 वर्षांच्या इमाझुशी शेफ मसानोरी सुगीउरा या स्वत:देखील स्पर्धात्मक बॉडीबिल्डर आहेत. (हेही वाचा, लॉक डाऊन काळात ऑनलाइन Food Order करणे पडले महागात; महिलेला 50 हजाराचा गंडा)

'डिलिव्हरी माचो' (Delivery Macho) म्हमून इमाझुशी शेफ मासानोरी सुगीउरा यांनी आपल्या त्या सहकाऱ्यांची निवड केली आहे. ज्यांनी त्यांच्यासोबत व्यायामशाळेत बॉडिबिल्डर अथवा फिटनेस ट्रेनर म्हणून काम केले आहे. महामारिच्या काळात इतर कामे बंद असल्याने या सहकाऱ्यांचे योगदान इमाझुशी शेफ आपल्या व्यवसायात घेऊ इच्छितात.

सुशी रेस्टॉरंट (Sushi Restaurant) मार्फत 'डिलिव्हरी माचो' (Delivery Macho) बॉयकडून जर ऑनलाईन फूड ऑर्डर स्वीकारायची असेल तर ग्राहकांना कमित कमी 7000 येन (7000 Yen) म्हणजेच भारतीय चलनात साधारण 4,825.84 रुपये इतक्या रकमेची ऑर्डर नोंदवणे आवश्यक आहे.

दरम्यान, आपल्या या संकल्पनेबाबत इमाझुशी शेफ मसानोरी सुगीउरा यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. इमाझुशी शेफ मसानोरी सुगीउरा यांचे ट्विट सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र, काही का असेना इमाझुशी शेफ मसानोरी सुगीउरा या नव्या संकल्पनेमुळे आणि अनेकांचे व्यवसाय तोट्यात चालले असताना प्रतिदिन सुमारे 10 ऑर्डर तर नक्कीच मिळवतात. दहा ऑर्डरमधून त्यांना मिळणारा मोबदला आहे जवळपास 1.5 मिलियन येन (1.5 Million Yen) म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 10,34,107.87 रुपये.