Angela Merkel | (File Image)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी विरोधात लसीकरण मोहीम जगभरामध्ये जोमात आहे. सुरुवातीला 45 वर्षांवरील आणि त्यानंतर साधारण 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय जगभरातील अनेक देशांनी घेतला. भारतातही असा निर्णय घेण्यात आला आहे. यात मुद्दा उपस्थित केला जात होता लहान मुलांबाबत. 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण (Corona Vaccination of Children) होणार का? याबाबत जगभरात चर्चा होती. दरम्यान, जर्मनी (Germany) सरकारने त्यांच्यापूरता हा प्रश्न सोडवला आहे. जर्मनीमध्ये 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण (Corona Vaccination) केले जाणार आहे. जर्मनीच्या पंतप्रधान एंजेला मर्केल (Angela Merkel) यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, यूरोपियन मेडिसिन एजेंसीने या आधीच 16 ते 18 वर्षे वयोटातील मुलांचे कोरोना लसीकरण करण्यास मान्यता दिली आहे.

महासत्ता अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी लगान मुलांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीकरणादरम्यान प्रामुख्याने फायजर लस दिली जात आहे. जर्मनीच्या स्तानिक नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान अँजेला मार्केल यांनी म्हटले आहे की, देशातील 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुले कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठीची लस घेण्यासाठी नोंदणी करु शकतात. मार्केल यांनी म्हटलेआहे की, नव्या शैक्षणिक वर्षापूर्वी ही मुले कोरोना लस घेऊ शकतात. या मुलांना लसीचे दोन्ही डोस दिले जातील. (हेही वाचा, Mask Rules In South Korea: लसीकरण झालेल्यांना मास्क वापरण्याची गरज नाही; US नंतर दक्षिण कोरिया सरकारकडून नागरिकांना सशर्थ सवलत)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एंजेला मार्केल यांनी म्हटले आहे की, पालकांसाठी एक संदेश आहे की, प्रत्येक पाल्याचे लसीकरण झालेच पाहिजे असे बंधन नाही. ज्या पालकांना आपल्या पाल्याचे लसीकरण व्हावे असे वाटते त्यांनी करावे. कोणावरही सक्ती नाही. शाळांनी मुलांचे लसीकरण करण्याची आवश्कता नाही. तसेच, केवळ कोरोना लसीकरण केलेल्या मलांसोबतच सुट्टीवर जाण्याबाबत आपण विचार करत असाल तर ते चुकिचे असल्याचेही मार्केल यांनी सांगितले.

दरम्यान, 12 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायजरची लस अधिकृत करण्यात आली आहे. याशिवाय अमेरिका आणि आखाती देशांमध्येही मुलांचे कोरोना लसीकरण केले जात आह. फायजरने मार्च 2020 च्या अखेरीस अमेरिकेत 12 ते 15 वर्षे वयोगटातील 2,260 स्वयंसेवकांवर केलेल्या एका स्वतंत्र अभ्यासातील निष्कर्षानंतर अहवाल सादर केला. यात पुढे आले की, कोरोना लसीकरण झालेल्या कोणत्याही मुलाला कोरोना व्हायरस संसर्ग झाला नाही.