Columbian Military Helicopter Crashes (Photo Credit - Twitter)

लष्करी सेवेतील चौघांना घेऊन जाणारे कोलंबियन लष्कराचे हेलीकॉप्टर (Colombian Military Helicopter) कोसळले आहे. या हेलिकॉप्टर अपघातात चौघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (19 मार्च) दुपारच्या सुमारास घडली. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो (President Gustavo Petro) यांनीही या वृत्ताची पुष्टी केली आहे. हेक्टर जेरेझ, टी.ई. ज्युलिथ गार्सिया, एसएस. जोहान ओरोझको आणि एस.एस. रुबेन लेगुइझामोन अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

दुर्घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये हेक्टर मॉरिसिओ जेरेझ ओचोआ हे बुमंग्यूजचे राष्ट्रीय लष्कराचे पायलट होते. ज्युलिथ गार्सिया ही UH 1N हेलिकॉप्टर उडवणारी कोलंबियन नॅशनल आर्मीमधील तिच्या श्रेणीतील सर्वात वरिष्ठ महिला अधिकारी होती. ही महिला मूळची कुकुटा, नॉर्टे डी सांतांडे येथील रहिवासी होती आणि विशेषतः प्रगत लढाई, स्कायडायव्हिंग यांमध्ये कुशल होती. (हेही वाचा, Indian Navy Helicopter Crashes: भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईजवळ अपघातग्रस्त, तीन पायलट सुखरुप)

हेलिकॉप्टर क्रॅश होतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात पाहायला मिळते की, हवेत उंचावर असलेले एक हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर गेले आणि हवेत खिरट्या घालण्याऐवजी ते स्वत:भोवतीच गोलगोल फिरत जमीनीच्या दिशेने वेगाने येत कोसळले.

ट्विट

व्हायरल झालेल्या भयंकर व्हिडिओत पाहायला मिळते की, कोलंबीयातील चोकोमधील क्विडो (Quibdo area in Choco) परिसरात एक हेलिकॉप्टर हवेतून खाली येत आहे. जे स्वत:भोवती फिरता फिरता नियंत्रण सुटून जमीनीच्या दिशेने खाली येत आहे. अखेर हे हेलिकॉप्टर शहरानजिकच्या झाडीत कोसळते.

ट्विट

स्थानिक अधिकाऱ्यांनी पटवलेल्या ओळखीमध्ये पुढे आले की, हेलिकॉप्टर अपघातात चौघांचा मृत्यू झाला. हे चौघेही सबंधित विभागात मदत आणि इतर काही विविध गोष्टींचा पुरवठा करणारे अधिकारी होते.

व्हिडिओ

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीत म्हटले की, देशवासियांना कळविताना मला अत्यंत दु:ख होत आहे की, क्विब्डो येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत कोणाचेही प्राण वाचू शकले नाहीत. मी या अपघाताली सर्व मृतांच्या दु:खात त्यांच्या सोबत आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांना एकटे सोडणार नाही.