Indian Navy Helicopter Crashes: भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईजवळ अपघातग्रस्त, तीन पायलट सुखरुप
Helicopter | Representative Image (Photo Credits: pixabay)

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईजवळ (Mumbai) अपघातग्रस्त (Indian Navy Helicopter Crashes ) झाल्याचे वृत्त आहे. हेलिकॉप्टरमधील तीन पायलटना सुखरुपपणे बाहेर काढण्यास यश मिळाले आहे. अपघात नेमका का झाला याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, ध्रुव्ह असे या हेलिकॉप्टरचे नाव असल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, नौदलाच्या हेलिकॉप्टरचा समुद्र किनाऱ्याजवळ अपघात झाला. नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टने त्वरित शोध आणि बचाव सुरू केला ज्यामुळे तीन क्रू सदस्यांची सुरक्षित सुटका झाली. अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय नौदलाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अपघाताबाबत प्राथमिक माहिती अशी की, भारतीय नौदलाचे एएलएच हेलिकॉप्टर मुंबईच्या नियमित उड्डाणावर समुद्रकिनाऱ्याजवळ आले. यावेळी ते अचानक दुर्घटनाग्रस्त बनले. दरम्यान, नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टला याबाबत त्वरीत माहिती मिळाल्याने मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले.

नौदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे एक शस्त्राधारित अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) क्रॅश झाले होते, त्यात सर्व पाच जवानांचा मृत्यू झाला होता.