Cocaine Sharks: ब्राझीलमधील शास्त्रज्ञांनी पुष्टी केली आहे की रिओ डी जानेरोजवळ शार्क माशांच्या स्नायू आणि यकृतामध्ये कोकेनचे उच्च प्रमाण आढळले आहे. ब्राझीलच्या(Brazil) किनाऱ्याजवळील शार्क माशांमध्ये संशोधकांना कोकेनचे अंश सापडले(Cocaine Shark) आहेत. या शार्कमध्ये कोकेन कसे आढळले यावर अनेक सागरी जीवशास्त्रज्ञांमध्ये वाद झाला आहे. चाचण्यांमध्ये असे दिसून आले की शार्कच्या प्रत्येक नमुन्याची चाचणी कोकेनसाठी सकारात्मक आहे. याव्यतिरिक्त, 92 टक्के स्नायूंच्या नमुन्यांमध्ये आणि 23 टक्के यकृताच्या नमुन्यांमध्ये बेंझॉयलेकगोनिन हे प्राथमिक कोकेन मेटाबोलाइट होते. फ्री-रेंजिंग शार्कमध्ये कोकेनचा हा पहिला पुरावा आहे. (हेही वाचा: Asteroid Alert by NASA: 380 फूटांच्या 2011 MW1 लघूग्रहाचा पृथ्वीच्या जवळून प्रवास; नासाकडून अलर्ट जारी)
कोकेन शार्कबद्दल माहिती
कोकेन शार्क म्हणजे अशा शार्क ज्यांच्या प्रणालींमध्ये कोकेनचे अंश आढळले आहेत. कोकेनमुळे सागरी जीवनावर कसा परिणाम होत आहे हे अधोरेखित करण्यासाठी हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. या सागरी प्राण्यांमधील कोकेनचा स्रोत अजूनही वादातीत आहे. परंतू काही सिद्धांत सुचवतात की कोकेन सामान्यत: बेकायदेशीर ड्रग लॅबमधून किंवा उपचार न केलेल्या सांडपाण्याद्वारे पाण्यात येडलो जातात. जेव्हा ड्रग्ज वापरकर्ते पदार्थांची अयोग्यरित्या विल्हेवाट लावतात तेव्हा ते सागरी जीवन दूषित करू शकतात. (हेही वाचा: Viral Video: १३ व्या मजल्यावरून पडून देखील महिलेचा जीव वाचला, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल)
शार्क आणि इतर समुद्री प्राणी जेव्हा दूषित पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा ते त्यांच्या त्वचेद्वारे औषध शोषूण घेतात. अभ्यासातून हेही समोर आले आहे की कोकेनच्या संपर्कात आल्याने प्राण्यांमध्ये आक्रमकता वाढू शकते. शार्कमधील पोहण्याच्या पद्धतींमध्ये बदल होऊ शकतो. हे वर्तनात्मक बदल त्यांच्या नैसर्गिक सवयी आणि पर्यावरणीय भूमिकांमध्ये व्यत्यय आणू शकतात.