प्रतिकात्मक फोटो | (Photo Credits: Twitter/ ANI)

गुजरातच्या (Gujarat) किनार्‍यालगत अरबी समुद्रातून तटरक्षक दलाने (Coast Guard) 10 पाकिस्तानी नागरिकांना (Arrests 10 Pakistanis) पकडले आहे. हे सर्वजण 'यासिन' या पाकिस्तानी बोटीत होते. 8 जानेवारीच्या रात्री ही घटना घडली. कारवाईचा एक भाग म्हणून तटरक्षक दलाने त्यांना पकडले. ही बोट आता चौकशीसाठी पोरबंदरला आणण्यात आली आहे. पाकिस्तानी बोट पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुजरातच्या किनाऱ्यावर एक बोट पकडली होती. त्यात पाकिस्तानचे 12 क्रू मेंबर्स होते. दोन दिवसांत पाकिस्तानी बोट पकडण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी शुक्रवारी बीएसएफने (BSF) पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात सीमेवर पाकिस्तानची एक बोट पकडली होती.

एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना बीएसएफच्या (BSF) एका अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय सीमेवर ही बोट पेट्रोलिंगदरम्यान पकडली गेली. अशा बोटीचा वापर करून ड्रग्जची खेप वाहतूक केली जाते. हिवाळ्यात, पाकिस्तानी दाट धुक्याचा फायदा घेतात आणि ड्रग्ज पुरवतात. अलीकडच्या काही दिवसांत पंजाबमध्ये पाकिस्तानचे अनेक ड्रोन पकडले गेले आहेत. (हे ही वाचा Pakistan: हिल स्टेशनवर बर्फाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी कार बनली 'कबर', थंडीमुळे 16 जणांचा मृत्यू)

अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, पाकिस्तान ड्रग्जची खेप भारतासह इतर देशांमध्ये समुद्रमार्गे नेण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करून अल हुसेनी ही पाकिस्तानी बोट भारतीय पाण्यात पकडली होती. त्याच्या झडतीत 77 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 400 कोटी रुपये आहे. यावेळी पाकिस्तानी बोटीतून 6 जणांना पकडण्यात आले.