चीन - भारत युद्ध? तिबेट सीमेवर मोठी तयारी
india china | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

डोकलाम प्रश्नावरुन निर्माण झालेला तणाव आता काहीसा निवळला असला तरी, चीनच्या कुरापती थांबल्या नाहीत. डोकलाम परिसारत चीन (China) सातत्याने लष्करी वाढ (Chinese military) करत असल्याचे वृत्त आहे. प्रसारमांध्यमांनीही डोकलाम परिसरात चीन लष्करी युद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी करत असल्याचे वृत्त दिले आहे. काही प्रसारमाध्यमांनी तर हिमालयाकडील दिशेने चीनी सैन्य छोटे-छोटे टँकसोबतच उंच प्रदेशावरुन खालच्या प्रदेशावर मारा करणारी मोबाईल हॉवित्जर (Mobile Howitzers) शस्त्रांचीही जमवाजमव करत असल्याचे म्हटले आहे.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनने तिबेटच्या खुल्या जागेत चीनी सैन्याचे मोबाईल हॉवित्जर तैनात केले आहे. सीमा सुरक्षेत सुधारणा तसेच, चीनी सैन्याला उंचावरुन विरोधकांचा सामना करता यावा म्हणून रचलेली रणनीती असा त्यामागचा उद्देश असल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी चीनी अभ्यासकांच्या हवाल्याने म्हटले आहे की, नवी शस्त्र पीएलसी-181 या वाहनांमध्येही हॉवित्जर असतील.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने भारतीय प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, लष्कर आणि टीव्ही पत्रकार सोंग झोंगपिंग यांनी ग्लोबल टाईम्सशी बोलताना सांगीतले की, हॉवित्जरमध्ये 50 किलोमीटरहून अधिक पल्ल्यात मारा करणाऱ्या 52 कॅलिबर तोफांचा समावेश आहे. यात लेजर-गायडेड आणि सॅटेलाईट-गायडेड प्रोजेक्टाईलही आहेत. सोंग यांनी असेही म्हटले आहे की, तिबेट्टमध्ये पीएलएची उंचावरुन मारा करण्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. (हेही वाचा, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पतंप्रधान इम्रान खान शिखर परिषदेसाठी इस्लामाबाद - वॉशिंग्टन यांच्यात चर्चा)

दरम्यान, प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या चीनच्या या आगळीकीवर भारताने अद्याप प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त नाही.