चंद्राच्या अंधाऱ्या भागावर चीनने उतरवले यान; रचला नवा इतिहास
China's rover lands on moon (Photo Credit-Twitter)

अंतराळातील महत्त्वपूर्ण कामगिरी आणि अजब गजब शोध यासाठी चीन (China) हा देश ओळखला जातो. आता चीनच्या नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (China's National Space Administration) पृथ्वीवरुन चंद्राच्या न दिसणाऱ्या भागावर यान उतरवून नवा इतिहास रचला आहे. 'चांगे 4' असे या यानाचे नाव आहे. चीनने चंद्रावर ज्या ठिकाणी हे यान उतरवले आहे त्याठिकाणी अद्याप कोणीही पोहचू शकलेले नाही. जगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)

चीनी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या यानाचे यशस्वी लँडिंग झाले असून चंद्राच्या विरुद्ध बाजूची चित्रेही पाठवली आहेत. चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजूला 'डार्क साईड' असे म्हणतात. कारण चंद्राचा तो भाग पृथ्वीवरुन कधीच दिसत नाही. चंद्रावर गेलेल्या या यानामुळे चंद्राच्या त्या भागातील पृष्ठभागाची रचना आणि खनिजांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. चीनमध्ये जन्मलं जगातील पहिलं Designer Baby; शास्त्रज्ञांचा दावा

चीनचा वेगाने होणार विकास पाहता, चीन अमेरिकेलाही टक्कर देऊ शकतो. 2020 पर्यंत तिसरे अंतराळ स्टेशन पूर्णपणे कार्यरत करण्यासाठी चीन सध्या प्रयत्नशील आहे.