जगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक ; चीनी वृत्तसंस्थेने केली निर्मिती (Video)
जगातील पहिला रोबो वृत्तनिवेदक (Photo Credit : Twitter)

चीन हा देश सर्वाधिक लोकसंख्या आणि अजब गजब शोधांमुळे ओळखला जातो. मानवासारख्या दिसणाऱ्या यंत्रमानवाची निर्मिती चीनने केल्याचे सर्वश्रूत आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी चीनने छोट्या मुलांसोबत खेळण्यासाठी खास यंत्रमानवाची निर्मिती केली होती. आता मात्र वृत्त निवेदनाचे काम करणारा रोबो बनवून चीनने जगाला अचंबित केलं आहे.

कृत्रिम बुद्धीमत्ता असलेल्या या वृत्तनिवेदनाची निर्मिती चीनची वृत्तसंस्था क्षिनुआ आणि चीनी सर्च इंजिन कंपनी सोगोऊ यांनी एकत्रितपणे केली आहे. या वृत्तनिवेदकाचं नाव 'झँग' असं ठेवण्यात आलं आहे. हा झँग इंग्रजी आणि मँडेरिन भाषेत वृत्त निवेदन करु शकेल.

झँगच्या वृत्तनिवेदनाचा व्हिडिओ क्षिनुआनं प्रसिद्ध केला आहे. हा झँग हुबेहुब माणसासारखे हावभाव करुन मानवी आवाजात बोलू शकतो. या रोबोची कार्यक्षमता माणसापेक्षा अधिक आहे. त्यामुळे तो अधिक वेळ काम करु शकेल. परिणामी कामातल्या चुका कमी होवून काम अधिक वेगाने होईल.