Coronavirus: चीनसमोर नवे आव्हान उभे; कोरोना व्हायरसच्या उपचारानंतर वूहानच्या डॉक्टरांची त्वचा पडली काळी
Wuhan Doctors Skin turn dark (Footage from Beijing Satellite TV/YouTube)

चीन (China) मधील कोरोना विषाणूचे (Coronavirus) प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे असे लक्षात येताच, सध्या तिथे पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता चीनसमोर एक नवीन संकट उभे ठाकले आहे. वुहान (Wuhan) मधील कोरोना रूग्णांवर उपचार करताना यी फॅन (Yi Fan) आणि हू वाईफेंग (Hu Weifeng) या दोन डॉक्टरांना कोरोना व्हायरस आजाराची लागण झाली होती. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते. आत त्यांची प्रकृती सुधारत असताना त्यांची संपूर्ण त्वचा काळी पडली आहे. त्वचेचा रंग अचानक कसा बदलला याबाबत ठोस कारण समोर आले नसले तरी,  यांची काळजी घेत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की हार्मोन्समधील बदलांमुळे त्यांच्या त्वचेचा रंग काळा झाला आहे.

डॉक्टर हू वाईफेंग हे कोरोना इन्फेक्शन रिपोर्टिंग टीमचे  सदस्य आहेत. 18 जानेवारीला या दोन्ही डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यी फॅन हृदयरोग तज्ञ आहेत आणि 39 दिवसात त्यांनी कोरोनाला पराभूत केले आहे. या दरम्यान त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. हू वाईफेंग यांचा संघर्ष आणखीन वेदनादायक होता. हू रुग्णालयात 99 दिवस राहिले, पैकी 45 दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर लाइफ सपोर्ट देण्यात आला. 6 आठवड्यांच्या उपचारानंतर दोघांचे शरीर काळे पडले. (हेही वाचा: Coronavirus उपचारांवर Hydroxychloroquine विशेष फायदेशीर नाही; संशोधकांचा दावा)

Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात ५ हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण; भारतात २० हजाराचा आकडा पार - Watch Video 

डॉ ली शुशेंग यांच्या मते, त्वचेच्या रंगामध्ये बदल होण्याचे कारण उपचार दरम्यान दिले जाणारे कोणतेतरी औषधही असू शकते, मात्र नक्की कोणते हे स्पष्ट झाले नाही. डॉ ली सांगतात, असे अपेक्षित आहे की याचे दुष्परिणाम कमी झाल्यानंतर त्वचेचा रंग पूर्ववत होईल. दरम्यान, हे हे दोघेही डॉक्टर प्रसिद्ध चीनी डॉक्टर ली वेनलियांग यांचे सहकारी होते. लीचा कोरोना व्हायरस आजारामुळे 7 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी, चिनी अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणू बाबतची माहिती पसरल्याबद्दल त्यांना शिक्षा केली होती.