Ali Ahmed Aslam Died: ज्यांना नॉनव्हेज खाण्याची आवड आहे त्यांना चिकनच्या पाककृती खूप आवडतात. चिकनपासून विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. चिकन टिक्का मसाला त्यापैकीच एक. चिकन टिक्का लोकांना खूप आवडतो, नंतर चिकन टिक्काचे ग्रेव्ही रेसिपीमध्ये रूपांतर झाले आणि नंतर ती स्नॅक म्हणून लोकप्रिय करी डिश बनली. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, ही रेसिपी आधी कोणी बनवली असेल? चिकन टिक्का मसाला बनवण्याचा विचार कोणाच्या मनात कुठून आणि कसा आला असेल? याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत. चिकन टिक्का मसाल्याचा शोध लावणाऱ्या शेफचे नुकतेच निधन झाले. ग्लासगोचे शेफ अहमद अस्लम अली (Ali Ahmed Aslam) यांनी चिकन टिक्का मसाला तयार केल्याचा दावा केला होता. वयाच्या 77 व्या वर्षी अहमद अस्लम अली यांचे निधन झाले.
अहमद अस्लम अली यांचे निधन -
1970 च्या दशकात अस्लम अली यांचे ग्लासगो येथे शीश महल नावाचे रेस्टॉरंट होते. या रेस्टॉरंटमध्येच एके दिवशी त्यांनी टोमॅटो सूपपासून तयार होणारी चटणी सुधारून चिकन टिक्काचा शोध लावला. अहमद यांचे कुटुंबीय आणि पुतणे अंदलिब अहमद यांनी माहिती दिली की, अहमद अस्लम अली यांचे सोमवारी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. गेल्या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या वेळीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अली यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. (हेही वाचा - Restaurant Bill Viral: हॉटेलचे 1985 मधील बिल व्हायरल, किंमत पाहून नेटीझन्स थक्क, म्हणाले 'अरेच्चा! इतके कमी?')
Ali Ahmed Aslam, widely accepted as the inventor of the Chicken Tikka Masala, has died aged 77.
Ali was born in Pakistan and moved to Glasgow as a young boy and would go on to open up Shish Mahal in 1964, where ‘Britain’s favourite dish’ was created. #ChickenTikkaMasala pic.twitter.com/VJS90K3Bkf
— Nishan Sampreeth Chilkuri (@nishanchilkuri) December 21, 2022
अहमद अस्लम अली कोण आहेत?
अहमद अस्लम अली हे मूळचे पाकिस्तानातील पंजाब भागातील आहेत. ते लहान वयातच आपल्या कुटुंबासह ग्लासगो येथे स्थायिक झाले. त्यांनी 1964 मध्ये ग्लासगो पश्चिम येथे शीश महल रेस्टॉरंट उघडले.
अहमद अस्लम अलीचे रेस्टॉरंट
अहमद अस्लमबद्दल त्याचा पुतण्या अंदलिबने सांगितले की, ते रोज त्याच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असे. रेस्टॉरंट हे त्याचे जीवन होते. तिथे काम करणारे आचारी त्याच्यासाठी करी बनवत असतं. अहमद त्याच्या कामात एकदम परफेक्शनिस्ट होते.
चिकन टिक्का मसाल्याचा शोध कसा लागला?
2009 मध्ये अहमद अस्लम अली यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एका ग्राहकाने तक्रार केली की, त्यांचा चिकन टिक्का खूप कोरडा आहे. तक्रारीनंतर अस्लम अली यांनी चिकन टिक्का मसाल्याची रेसिपी तयार केली. या रेस्टॉरंटमध्ये चिकन टिक्का मसाल्याचा शोध लागल्याचे अली सांगत असे.