कॅनडा (Canada) येथल नोवा स्कोटिया परिसरात पोलिसांच्या वर्दीत आलेल्या एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला करणाऱ्या एका संशयित व्यक्तिस ठार मारण्यात आले आहे. कॅनडाच्या इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच आणि अत्यंत भयावह अशी घटना असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कॅनेडीयन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन (CBC) ने आवल्या वृत्तात म्हटले आहे की, हैलिफैक्स येथून सुनमारे 130 किलोमीटर उत्तरेला असलेल्या पोर्टापिक येथील एका छोट्या शहरात रविवारी घरांबाहेर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची मृत शरीरं मिळाली.
पोलिसांनी घटनेची माहिती कळताच आरोपीचा शोध सुरु केला. घटना घडलेल्या पोर्टापिक परिसरात मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी केली. नागरिकांना सांगण्यात आले की, घराबाहेर पडू नये. तसेच, घराचे दरवाजे बंद करुन तळघरात रहावे. दरम्यान, कोरोना व्हायरस संकटामुळे कॅनडात आगोदरच लॉकडाऊन सुरु आहे.
पोलिसांनी सांगिले की, गोळीबार करणारा व्यक्ती 51 वर्षांचा असून, गैब्रियल वोर्टमॅन असे त्याचे नाव असल्याचे पुढे आले आहे. अलिकडेच तो पोर्टापिक येथे राहायला आला होता. इथे राहायला येऊन त्याला फार काळ झाला नव्हता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याने पोलिसांची वर्दी अंगावर घातली. त्याने आपली कारही रॉयल कॅनेडीयन माऊंटेड (RCMP)पोलीस अधिकाऱ्यांच्या कारप्रमाणे बनवली होती.
दरम्यान, या आधी पोलिसांनी माहिती देताना सांगितले होते की, हैलिफैक्स जवळील एनफील्डच्या एका गॅस स्टेशनवर वोर्टमॅन (संशयीत बंदुकधारी हल्लेखोर) याला अटक करण्यात आली आहे. मात्र, नंतर त्याला ठार मारण्यात आले. दरम्यान, हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले किंवा नाही. तसेच, ठार मारण्यात आलेला व्यक्ती हल्लेखोरच होता का? याबाबतही पोलिसांनी मौन बाळगले आहे.
सीबीसीने रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलीस प्रवक्ता डेनियल ब्रिएन यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, संशयीताने केलेल्या हल्ल्यात 16 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला अचानक सुरु झाला नाही, अशी चर्चा आहे. तसेच, या हल्ल्यामागे नेमके कारण काय असावे याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.