पाकिस्तानचे टॉप राइड-हेलिंग आणि मोबिलिटी अॅप बायकिया (Bykea) हॅक झाल्याचे वृत्त आहे. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर या गोष्टीची पुष्टी करत, अॅपमध्ये लॉग इन करताना मिळालेल्या 'अपमानजनक' संदेशांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. 'पाकिस्तान टॉप राइड-हेलिंग, मोबिलिटी अॅप Bykea हॅक झाले आहे', असा संदेश वापरकर्त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच या संदेशामध्ये पाकिस्तानबाबत वाईट शब्दांचा वापर केला आहे. Bykea ने अधिकृत निवेदन जारी करत सांगितले आहे की, त्यांचे थर्ड-पार्टी कम्युनिकेशन टूल हॅक झाले होते मात्र आता हे अॅप पूर्णपणे कार्यरत आणि वापरण्यास सुरक्षित आहे. (हेही वाचा: डिजिटल अर्थव्यवस्थेतील सुरक्षा हे जागतिक आव्हान, त्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज- Minister Rajeev Chandrasekhar)

बायकिया झाले हॅक-  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)