Photo Credti- X

Iran Bus Accident: इराणच्या याझद शहरात मंगळवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ते अपघात झाला. इराणहून(Iran) इराकला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसचा अपघात (Bus Accident)झाला. यामध्ये 28 पाकिस्तानी (Pakistan)नागरिकांचा मृत्यू झाला, तर 23 जण जखमी झाले आहेत. तेहरान येथील पाकिस्तानी राजदूताने बुधवारी या घटनेला दुजोरा दिला. इराणमधील पाकिस्तानचे राजदूत मुदस्सीर टिपू यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मंगळवार रात्री उशिरा याझद शहरात एका रस्ते अपघातात 28 पाकिस्तानी यात्रेकरूंचा मृत्यू झाला. तर, 23 यात्रेकरू जखमी झाले आहेत. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी कोणतेही शब्द नाहीत. परंतु या अपघातात जखमींना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.' (हेही वाचा :Canada Accident: कॅनेडात एकसह अनेक वाहनांची धडक होऊन घडला भीषण अपघात, घटनेत भारतीय जोडप्यासह त्यांच्या नातवंडाचा दुर्दैवी मृत्यू)

ते पुढे म्हणाले की, या अपघाताची माहिती मिळताच अधिकारी इराणसाठी रवाना झाले आहेत. इराणची राजधानी तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासापासून सुमारे 700 किमी अंतरावर हा अपघात झाला. राजदूत मुदस्सीर टिपू म्हणाले की, "जाहेदान शहरातील आपत्कालीन स्थितीवर अधिकारी लक्ष देत आहेत. आवश्यक त्या मदतीसाठी इराण सरकार यझदच्या महापौरांच्या कार्यालयाशी संपर्कात आहे." (हेही वाचा : Benglurur Accident: ॲम्ब्युलन्ससाठी रस्ता मोकळा करताना कार उलटली, बेंगळूरू येथील अपघात (Watch Video))

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. "पाकिस्तानी यात्रेकरूंच्या बसचा इराण येथील याझदजवळ अपघात झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला खूप दु:ख झाले आहे. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. तेहरानमधील पाकिस्तानी दूतावास पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करेल." असे त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील इराणचे राजदूत रजा अमीरी मोघदाम यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. ते इराणमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले की, 'मी पाकिस्तान सरकार आणि तेथील लोकांप्रती शोक व्यक्त करतो आणि जखमींच्या सुरक्षित आणि त्वरीत बरे होण्याची इच्छा करतो.'