Benglurur Accident: बेंगळुरू येथे इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हरवर एक अपघात झाला. रुग्णवाहिलेला रस्ता मोकळा करताना भरधाव वेगात असलेली कार उलटली आहे. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना सोमवारी ५.३०च्या सुमारास घडली. (हेही वाचा- नव्या कोऱ्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बिघाड, शोरूमबाहेरच वाहनाचे अंत्यसंस्कार करत ग्राहकाचे अनोख्या पद्धतीने निषेध (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळूरु येथील इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हरवरून रुग्णवाहिका जात असताना एक कार उलटली. रुग्णवाहिकेसाठी कार बाजूला जाण्याच्या प्रयत्न करत होती तेवढ्यात अनियंत्रित कार उलटली. कार पलटल्याने युलू ई बाईकवर आणि नंतर दुभाजकावर आदळली. सुदैवाने कोणतेही वाहन पुलावरून खाली पडले नाही. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. दोघांनाह किरकोळ जखम झाली अशी माहिती आहे.
Bengaluru: Car overturns on Electronic City flyover while making way for Ambulance; Video goes viral (WATCH)https://t.co/1lpnWrECR4
— Asianet Newsable (@AsianetNewsEN) August 20, 2024
ही घटना समोरून जाणाऱ्या कारच्या रियर व्ह्यू कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. इतर प्रवाशांनी अपघातग्रस्त प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी निर्माण झाली. इलेक्ट्रॉनिक सिटी ट्रॅफिक पोलिसांनी तत्परतेने प्रतिसाद दिला, परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बॅरिकेड्स लावले