Burj Khalifa New Years Celebration 2021: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दुबई सज्ज; या ठिकाणी Live पहा 'बुर्ज खलिफा'वर होणारी नयनरम्य आतषबाजी
Burj Khalifa (Photo Credit : Pixabay)

सरते वर्ष 2020 ला निरोप देऊन नवीन वर्ष 2021 चे (New Years 2021) स्वागत करण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. अशात जगातील अनेक ठिकाणी नूतन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. यामध्ये जगातील काही खास इमारतींवर होणारे सेलिब्रेशन पाहण्यासारखे असते. अशीच एक इमारत म्हणजे दुबईची (Dubai) बुर्ज खलिफा (Burj Khalifa). कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे सेलिब्रेशन लक्षात घेता दुबईच्या रस्ते व परिवहन प्राधिकरणाने, 31 जानेवारी 2020 पासून 2 जानेवारी 2021 पर्यंत आपल्या सेवांच्या वेळेत बदल केला आहे. जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफा ही दरवर्षी नवीन वर्ष खास पद्धतीने साजरे करण्यासाठी ओळखली जाते, मात्र यावर्षी इथे नेहमीप्रमाणे धूम पाहायला मिळणार नाही.

दरवर्षी प्रमाणेच यंदाही अनेक पर्यटकांनी बुर्ज खलिफाच्या परिसरात गर्दी केली आहे. ही गर्दी टाळण्यासाठी दुबई मॉल किंवा बुर्ज खलिफा मेट्रो स्थानकांकडे जाणाऱ्या मेट्रो थांबवण्यात आल्या आहेत. ट्राम 31 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 2 जानेवारी रोजी सकाळी 1 वाजेपर्यंत नॉन स्टॉप चालू असणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता दुबई नवीन वर्षाचे स्वागत करेल. हा स्वागतोत्सव बुर्ज खलिफावर साजरा करण्यासाठी झुंबड उडाली आहे. तुम्ही देखील या ठिकाणी होणारी मनोहर आतिषबाजी लाईव्ह पाहू शकता. खाली दिलेल्या व्हिडीओवर क्लिक करून तुम्ही बुर्ज खलिफा नवीन वर्ष उत्सवादरम्यान होणाऱ्या फायरवर्क्स 2021 चा आनंद घेऊ शकाल.

दरम्यान, कोरोनाचे संकट पाहता, दुबईमध्ये प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी अगदी रात्रीही फेस मास्क घालणे बंधनकारक आहे. नवीन वर्षाच्या उत्सवाच्या कार्यक्रमापूर्वी  डाउनटाउन दुबई परिसराची स्वच्छता केली गेली आहे. तसेच शेख मोहम्मद बिन राशिद बुलेव्हार्डच्या प्रत्येक गेटवर हँड सॅनिटायझर स्टेशन उपलब्ध आहेत. (हेही वाचा: अनेक देशांमध्ये कोरोनाचे निर्बंध असताना, वूहान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने लोक एकत्र (Watch Video))

शेख मोहम्मद बिन राशिद बुलेव्हार्ड येथील लोकांसाठी क्यूआर कोड काळा आहे. हा क्यूआर कोड नवीन वर्षाच्या संध्याकाळी डाउनटाउन दुबईमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी त्यांचा अधिकृत प्रवेश असेल. U By Emaar अ‍ॅपद्वारे नोंदणी करून तो विनामूल्य मिळू शकतो. या संपूर्ण परिसरात प्रथमोपचारासाठी तंबू ठोकले आहेत, हरवले-सापडले विभाग उभारला आहे. रुग्णवाहिकांची सेवाही चालू आहे.