![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/10/Jair-Bolsonaro-380x214.png)
कोरोनाच्या महासंकटापासून बचाव करण्यासाठी जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान सुरु करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना सुद्धा लस घेण्यासाठी प्रोत्साहन केले जात आहे. भारतासह अन्य देशांनी सुद्धा लसीकरणासाठी उत्तम प्रतिसाद दिला आहे. अशातच ब्राजीलचे राष्ट्रपती Jair Bolsonaro यांनी लसीकरणाला विरोध केला आहे. त्यांनी असे म्हटले की, ते कोविड19 वरील लस घेणार नाही.(AstraZeneca ची ब्लू प्रिंट चोरून रशियाने बनवली आपली Sputnik V लस; अहवालामध्ये धक्कादायक दावा)
जायर बोल्सनारो यांनी एका मुलाखतीत असे म्हटले की, मी कोरोनावरील लस घेणार नाही आहे. तसेच नव्या अभ्यासावर लक्ष ठेवून आहे. माझी रोगप्रतिकारक क्षमता अधिक मजबूत आहे. त्यामुळे मी लस का घेऊ? पुढे असे म्हटले, ही गोष्ट अशी झाली की दोन रियाल (ब्राजील चलन) जिंकण्यासाठी 10 रियाल लॉटरीवर खर्च करावेत. याचा काही अर्थ नाही.
ब्राजीलनच्या नेत्यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी आणि सुरुवातीलाच व्हायरसची गंभीरता कमी करण्यासंदर्भात विविध वाद सुद्धा निर्माण केले आहेत. त्याचसोबत त्यांनाच आधी कोरोन झाला. बोल्सनारो यांनी वारंवार दावा केला की, चाचणीवरुन दिसून येते की, त्यांच्या शरिरात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँन्टीबॉडीज आहेत. त्यामुळे त्यांना लसीकरणाची काहीच गरज नाही.(धक्कादायक! खासगी Dentist कडे जायला नव्हते पैसे; महिलेने स्वतःच उपटून टाकले आपले 11 दात)
पुढे बोल्सनारो यांनी असे ही म्हटले की, माझ्यासाठी स्वातंत्र हे प्रत्येक गोष्टीच्या ही आधी येते. जर एखाद्या नागरिकाला लस घ्यायची नसेल तर तो त्याचा अधिकार आहे. ब्राजीलच्या 21.3 कोटी जनसंख्येच्या जवळजवळ 19 कोटी लोकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले आहे. तर अन्य 5 कोटी लोकांनी फक्त लसीचा एकच डोस घेतला हे. गेल्या आठवड्यात देशात कोविड19 मुळे मृत झालेल्यांचा आकडा 6 लाखांच्या पार गेला आहे. तर अमेरिकेनंतर हा दुसरा देश असून येथे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.