Rishi Sunak Sacks Suella Braverman: पीएम ऋषी सुनक यांचा मोठा निर्णय, ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या
Rishi Sunak, Suella Braverman (PC- Facebook)

Rishi Sunak Sacks Suella Braverman: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी पॅलेस्टाईनवर केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्या सरकारमधील गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन (Suella Braverman) यांची सोमवारी हकालपट्टी केली. वृत्तसंस्थेने रॉयटर्सच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सुनक यांनी सुएला ब्रेव्हरमनला सरकार सोडण्यास सांगितले. त्यानंतर सुएला यांनी हे निर्देश स्वीकारले.

या प्रकरणाबाबत सुनक यांच्यावर त्यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या काही घटकांचा दबाव होता. त्यांना विरोधकांच्या हल्ल्यांनाही सामोरे जावे लागले. काल लंडनमधील निदर्शकांच्या हिंसाचाराचा आणि आक्रमकांचा सामना केल्याबद्दल आमचे धाडसी पोलीस अधिकारी सर्व नागरिकांचे आभार मानण्यास पात्र आहेत, असं ब्रेव्हरमन यांनी रविवारी संध्याकाळी एका निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा -S Jaishankar Meets Rishi Sunak on Diwali: परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी घेतली ऋषी सुनक यांची भेट; दिवाळी गिफ्ट म्हणून दिली विराट कोहलीची स्वाक्षरी असलेली बॅट)

काही दिवसांपूर्वी, त्यांनी गाझामध्ये युद्धविरामाची हाक देणाऱ्या रॅलीचे वर्णन द्वेषी मोर्चा असे केले. ब्रेव्हमनच्या भूमिकेमुळे तणाव वाढला आणि उजव्या विचारसरणीच्या आंदोलकांना लंडनच्या रस्त्यावर उतरण्यास प्रोत्साहित करण्यात मदत झाली. सुनक यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला, असा आरोप करण्यात आला.

सप्टेंबर 2022 मध्ये माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी सुएला ब्रेव्हरमन यांची नियुक्ती केली होती. परंतु तिच्या वैयक्तिक ईमेलवरून अधिकृत दस्तऐवज पाठवल्यामुळे तिला पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी ऋषी सुनक यांनी तिला पुन्हा पदावर आणले.