
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama ) यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकात माजी पंतप्रधान मनमोनहन सिंह (Manmohan Singh) , काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi) आणि काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत उल्लेख केला आहे. नेत्यांच्या उल्लेखासोबतच ओबामा यांनी जगभरातील अनेक देशांतील प्रमुख नेत्यांचाही उल्लेख केला आहे. मनमोहन सिंह हे पंतप्रधान असताना तत्कालीन यूपीए सरकारच्या कार्यकाळात बराक ओबामा यांनी 2010 मध्ये दौरा केला होता. तसेच, नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना 2015 मध्येही बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले होते.
बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकाचा 'न्यूयॉर्क टाइम्स'ने परीचय छापला आहे. यात काही उल्लेख करण्यात आले आहेत. या उल्लेखानुसार रशीयाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे तत्कालीन संरक्षण सचिव बॉब गेट्स आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या नावाचाही समावेश आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबाबत बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, बॉब गेस्ट (अमेरिकेचे संरक्षण सचिव) आणि मनमोहन सिंह यांच्यात बरेच साम्य आहे. तर, राहुल गांधी यांच्याबाबत म्हटले आहे की, त्यांच्यात एक नर्वस, अनफॉर्मेंट क्वालीटी आहे. जसे की एखादा विद्यार्थी आपला अभ्यासक्रम पूर्ण करुन शिक्षकांना प्रभावित करण्यासाठी उत्सुक आहे. परंतू, त्याला संबंधित विषयात यश येत नाही.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्याबाबत ओबामा यांनी म्हटले आहे की, आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि रहम एमॅन्युअल यांच्यासारख्या हँडसम पुरुषांबाबत सांगितले जाते. परंतू, महिलांच्या सौदर्याबद्दल सांगितले जात नाही. त्यासाठी एक किंवा दोन उदाहरणेच पुरेसी आहेत. जसे की सोनिया गांधी.
राहुल गांधी हे बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना भारतात काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. ते 2017 मध्ये बराक ओबामा यांना एका दौऱ्यादरम्यान भेटले होते. राहुल गांधी यांनी या भेटीबाबत तेव्हा ट्विटही केले होते. राहुल गांधी यांनी या भेटीचे एक छायाचित्रही पोस्ट केले होते. यात म्हटले होते की राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यासोबत एक चांगली चर्चा झाली.