पाकिस्तानमध्ये Jamaat-ud-Dawa (JUD)आणि लष्कर ए तैयब्बा(LeT)यांच्या काही नेत्यांची बॅंक अकाऊंट्स पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यामध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफीज महम्मद सईद (Hafiz Muhammad Saeed)याचा देखील समावेश असल्याची माहिती पाकिस्तानी मीडीयाच्या हवाल्याने ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान हे बॅंक अकाऊंट रिस्टोरेशन करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सॅन्क्शन कमिटीची परवानगी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान The News या पाकिस्तानी मीडीया संस्थेच्या बातमीनुसार, ज्या नेत्यांची बॅंक अकाऊंट्स रिस्टोअर झाली आहेत त्यामध्ये अब्दुल सलाम भुत्तवी, हाजी अशरफ, झाफर इक्बाल याचा समावेश आहे. दरम्यान या सार्यांचा समावेश UNSC च्या यादीमधील दहशतवादी असून लाहोर जेल मध्ये त्यांना 1 ते 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सार्यांनीच त्यांचे कुटुंब सांभाळण्यासाठी आर्थिक चणचण जाणवत असल्याचं सांगत बॅंकेचे अकाऊंट्स रिस्टोअर करण्याची मागणी केली होती.
Bank accounts of Hafiz Saeed and JuD leaders restored after formal approval from United Nations sanctions committee: Pakistan Media (file pic) pic.twitter.com/znhksGq6hk
— ANI (@ANI) July 12, 2020
सुरूवातीला बॅंक अकाऊट्स रिस्टोअर करण्यासाठी तयारी नव्हती मात्र नंतर नियमित व्यवहारासाठी पुरेसे पैसे नव्हते, आर्थिक चणचण जाणवत असल्याचं सांगण्यात आले. कुटुंबालाही आर्थिक मदतीची गरज आल्याचं समोर आल्यानंतर यासार्यांचे अधिकृत बॅंक अकाऊंट्स पुन्हा सुरू जरण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे मागणी करण्यात आली. त्याला परवानगीनंतरच आता ही अकाऊंट्स पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत.