बांग्लादेश (Bangladesh) संस्थापक शेख मुजीबुर रहमान (Sheikh Mujibur Rahman) हत्या प्रकरणात एका माजी लष्करी अधिकाऱ्यास रविवारी (11 एप्रिल 2020) फाशी देण्यात आली. बाग्लादेशात 45 वर्षांपूर्वी झालेल्या सत्तापालटानंतर 15 ऑगस्ट 1975 या दिवशी रेहमान यांची हत्या करण्यात आली होती. बांग्लादेशातील कारागृह उपमहाअधिक्षक मोहम्मद दौहिदुल इस्लाम यांनी वृत्तसंस्था एफ न्यूजला माहिती देताना सांगितले की, लष्करातील बडतर्फ कॅप्टन अब्दुल माजिद यांना ढाका सेंट्रल कारागृहात मध्य रात्री फाशी देण्यात आली. स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री 12 वाजून एक मिनिटांनी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.
शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी माजित आणि त्यांच्या इतर सैन्य अधिकाऱ्यांविरुद्ध खटला सुरु झाल्यानंतर तब्बल 24 वर्षांनी ढाका येथे अटक केली होती. माजित यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याबाबत न्यायलयात दाखल असलेली याचिका राष्ट्रपती अब्दुल हमीद यांच्याकडे सोपविण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळण्यात आली होती.
रहमान यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत 12 लष्करी कर्मचाऱ्यांपैकी 5 अधिकाऱ्यांना फाशी देण्यात आले आहे. या पाच अधिकाऱ्यांना 27 जानेवारी 2010 या दिवशी फाशी देण्यात आली होती. रहमान यांची मुलगी आणि विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांच्या दुसऱ्या सत्तेच्या दुसऱ्या कार्यकाळात ही फाशी झाली आहे. रहमान हे बांग्लादेशमधील पहिले राष्ट्रपीता होते. बांग्लादेश निर्मितीनंतर ते पंतप्रधानही झाले होते.