Bangladesh Flag (Photo Credits: Wikimedia Commons)

हिंदू धर्माचे धर्मग्रंथ कोणत्याही प्रकारची नैतिक शिकवण देत नाहीत. सर्व धर्म हे एक प्रकारची अश्लील संहिता असल्याचे वादग्रस्त वक्तव्य तारिक रहमान (Tarique Rahman) यांनी फेसबुक लाईव्हमध्ये काढले आहेत. तारिक रहमान हे बांगलादेश मधील बांगलादेश गोनो अधिकार परिषदेचा संयुक्त निमंत्रक आणि जमात-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनेचा पाठिंबा असलेल्या नुरुल हक नूरचा वरिष्ठ नेते आहेत. बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर रहमान यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे.

बांगलादेशातील कट्टरपंथी गट नेहमीच हिंदूंच्या विरोधात वक्तव्ये करतो. या गटाला अनेकदा मात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (Bangladesh Nationalist Party ) राजकीय पक्ष आणि संघटनांचाही अनेकदा पाठिंबा मिळाल्याचे पाहायला मिळते. तारिक रहमान यांच्या वक्तव्याबद्दल वन इंडिया या वेबसाईटने इंडिया टुडेच्या वृत्ताचा हवाला देत वृत्त दिले आहे.

तारिक रहमान हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. या आधीही त्यांनी खूप वेळा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे आता त्यांनी हिंदू धर्मियांच्या ग्रंथांबद्दल अतिशय तिरस्कारयुक्त वक्तव्ये केली आहेत. या वक्तव्यावरुन भारतातूनही तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून हा वादा आणखी वाढेल, असे शक्यता व्यक्त केली जात आहे.