India-Australia Flags (Representational Image; Photo Credit: Wikimedia Commons)

ऑस्ट्रेलियातील आणखी दोन विद्यापीठांनी (Australian Universities) भारतातील काही राज्यांतील विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे. व्हिसा अर्जांमध्ये फसवणूक (Visa Fraud) झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर व्यक्त करण्यात येणाऱ्या चिंतेला प्रतिसाद म्हणून विद्यापीठांनी हा निर्णय घेतला आहे, असे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. व्हिक्टोरियामधील फेडरेशन युनिव्हर्सिटी (Federation University in Victoria) आणि न्यू साउथ वेल्समधील वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीने (Western Sydney University) पाठिमागील आठवड्यात शिक्षण प्रतिनिधींना पत्र लिहीले.

या पत्रामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश तसेच जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशांतील विद्यार्थ्यांना द सिडनी मॉर्निंगमध्ये भरती न करण्याबाबत कळवले आहे. द हेरॉल्डच्या हवाल्याने आमची इंग्रजी भाषेतील सहकारी वेबसाईट लेटेस्टलीने याबाबत वृत्त दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ऑस्ट्रेलियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी ऑस्ट्रेलियन आणि भारतीय विद्यार्थी एकमेकांच्या देशात राहतात आणि अभ्यास करतात आणि ते समृद्ध अनुभव घरी आणतात, असे विधान केले होते. असे असतानाही अशा प्रकारची बंदी पुढे आली आहे. फेडरेशन युनिव्हर्सिटीने एजंटांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "विद्यापीठाने काही भारतीय क्षेत्रांमधून गृहविभागाकडून व्हिसा अर्ज नाकारण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे."